शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी संकटात


शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी संकटात

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी घोड कालव्याखालील लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आज शेतातील उभ्या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असुन काही भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागलेली आहेत. त्यामुळे घोड लाभक्षेत्रातील पिकांना जीवदान देणेकरीता उपलब्ध पाण्यातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंतरावजी पाटीलसाहेब यांचेकडे केलेली आहे.

यावर्षी सुरुवातीच्या काळात घोड लाभक्षेत्रात पाऊस बऱ्या प्रमाणांत झाला. त्यामुळे यावर्षी पाऊस भरपूर होईल व १५ ऑगस्टपर्यंत घोडसह सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा विश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. परंतु पावसाने उडी मारल्यामुळे अंदाज चुकला व आज रोजी शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी संकटात सापडलेली आहेत. जर या पिकांना तातडीने पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अद्याप पावसाळ्याचे दिवस बाकी असुन आगामी काळात निश्‍चीत चांगला पाऊस होईल तसेच परतीचा पाऊस होवून घोड धरण पूर्ण क्षमतेने भरेल परंतु आज रोजी शेतातील उभ्या पिकांना जीवदान देणेकरीता धरणातील उपलब्ध पाण्यातून तातडीने आवर्तन सोडणेबाबत जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटीलसाहेब यांचेकडे आग्रही मागणी सौ. नागवडे यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News