पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 249 नवीन रुग्ण तर 250 रुग्णांना डिस्चार्ज


पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 249 नवीन रुग्ण तर 250 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत  आलीआहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची  संख्या  पण कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 249नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. तर 250रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 88हजार 049 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख76  हजार909इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8792जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये सध्या 2348अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 213रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8312 स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत.

अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News