मराठा आरक्षण ओबीसीमधून द्या- दीपक भानुसे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक


मराठा आरक्षण ओबीसीमधून द्या- दीपक भानुसे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक

पुणे: मराठा समाजाचा सरसकट ओबीसी  मध्ये सामावेश करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रचे  समन्वयक दीपक भानुसे यांनी केली आहे.आज पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली त्यानंतर  क्रांती मोर्चा महाराष्ट्रचे  समन्वयक दीपक भानुसे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीये, मराठा क्रांती मोर्चाच्या या मागणीमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ओबीसी नेते मराठा समाजाचा समावेश ओबीसीत नको म्हणतायेत. पुण्यात  झालेल्या आजच्या बैठकीत मराठा समन्वयकांनी हा  मोठा निर्णय घेतलाय...आता आरक्षण स्वतंत्र नको  ओबीसीमधूनच द्या मात्र 50 टक्क्यांच्या आत द्या अशी त्यांची मागणी आहे..या बैठकीला राज्यातून समन्वयक उपस्थित होते...

जाहिरात
Search
विडिओ
Recent News