तेली समाज बांधवानी संघटित होऊन ओबीसींच्या लढ्यात उतरावे - गजानन शेलार (नाना)


तेली समाज बांधवानी संघटित होऊन ओबीसींच्या लढ्यात उतरावे - गजानन शेलार (नाना)

-महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी बोलताना   कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे.(छाया-अमोल भांबरकर)       

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) - समाजाच्या प्रगतीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे .कार्यकर्त्यांनी फक्त पदे न घेता समाजकार्य करावे.ओबीसीच्या लढ्यात सहभागी व्हावे.समाज हितासाठी रस्त्यावर उतरावे.व संघर्ष करावा.ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलेच परंतु एक टक्का शैक्षणिक आरक्षण हि धोक्यात आहे.आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसींच्या सर्व घटकांनी एकत्रितपणे ओबीसींच्या लढ्यात सहभागी होण्याची गरज आहे.सर्व तेली समाज बांधवानी संघटित होऊन ओबीसींच्या लढ्यात उतरावे.असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन(नाना) शेलार यांनी केले.                                                  

 डाळमंडई येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर तेली समाज पंच वाडा येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी अध्यक्षस्थानी कोषाध्यक्ष गजानन (नाना) शेलार यांनी मार्गदर्शन केले.सभेचे नियोजन कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे व महानगर सचिव विजयराव दळवी यांनी केले होते.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ओबीसी आयोगाचे सदस्य डाॅ.भुषण कर्डिले,राज्य समन्वयक व ठाणे विभागाचे अध्यक्ष सुनील चौधरी,नाशिक विभागाचे महिला अध्यक्षा विद्याताई करपे,नाशिक विभागाचे सचिव रत्नाकर करणकाळ,लक्ष्मण देवकर,दिलीपराव साळुंके,माधवराव ढवळे,वसंतराव काळे,किसनराव क्षीरसागर,अँड विनायकराव दारुणकर,गणेश हजारे,सचिन म्हस्के,अनिल सैदर,रावसाहेब देशमाने,श्रीकांत सोनटक्के,उत्तर जिल्हाध्यक्ष भागवत लुटे,प्रमोद वाळके,भगवान लोखंडे,कैलास दारुणकर,कैलास क्षीरसागर,राजू भगत,सागर भगत,गोकुळ शिंदे,विक्रम शिंदे ,उमेश काळे,परसराम सैदर,रवींद्र करपे,कैलास देहाडराय,अँड मिनीनाथ देहाडराय,श्री बागडे,महिला मंडळाच्या सदस्या मीराबाई डोळसे,विमलताई जाधव,सारिका म्हस्के,सरला शिंदे,सौ.क्षीरसागर आदी उपस्तिथ होते.                                                                                      कार्यक्रमाच्या सुरुवात श्री विठ्ठल रखुमाई व श्री संताजी महाराज यांना पुष्पमाला अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.नाशिक विभाग सचिव पदी रवींद्र करपे तर जिल्हाध्यक्ष पदी रमेश गवळी व सागर भगत यांची तालुका युवा आघाडीच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली.       ओबीसी आयोगाचे सदस्य डाॅ.भुषण कर्डिले म्हणाले कि,ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे .कारण ४मार्च २०१ रोजी विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य या घटल्याचे निकाल सर्वोच्च न्या यालयाने  दिला.या याचिकेच्या निकालात सांगितलेल्या त्रिसूत्री चे पालन करून राज्य सरकार एम्प्रिकाल डाटा गोळा  करून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे प्रमाण निश्चित करीत नाही.तोपर्यंत ओबोसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होणार नाही.त्रिसूत्रीप्रमाणे राज्य सरकारला सर्व  प्रथम स्वतंत्रपणे सम्पुर्णतः समर्पित आयोग नेमावा लागणार आहे.  आयोगाद्वारे समकालीन कठोर अनुभव जनी चौकशी करून ओबीसींच्या मागासलेपणाची पद्धत व प्रमाण ठरवावे लागणार आहे.एम्प्रिकाल डाटा गोळा  करून त्याद्वारे ओबीसींचे राजकीय आरक्षणाचे प्रमाण ठरवावे लागणार आहे.आपण सर्वांनी एकत्र येऊन फक्त तेली समाजच नाही तर इतर समाजाला एकत्र करून ओबीसी व तेली समाजाचे अस्तित्व टिकवले पाहिजे.राजकारणात आपला टक्का वाढवणे किती आवश्यक आहे.ते पटवून दिले. राज्य समन्वयक व ठाणे विभागाचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचा कार्याचा लेखाजोखा मांडला.तेली समाजाच्या अनेक संघटना या कार्यरत आहेत.परंतु महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशात तिचे नांव गाजलेले आहे.परवा लोकसभेत महाराष्ट्र प्रांतिक तैलाक महासभेच्या संदर्भाने खासदार प्रितमताई मुंडे व खासदार श्री राहुलजी शेवाळे यांनी जनगणना व       एम्पिरिकल डाटा बाबत जे प्रश्न विचारले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.कारण त्यांनी लोकसभेत तैलिक महासभेने दिलेल्या निवेदनाचा संदर्भाने चर्चा घडवून आणली.सुटे तेल विकणाऱ्या तेली बांधवांसाठी मध्यंतरी बंदी आणण्यात आली होती. त्याबद्दल सुद्धा प्रांतिकचे नेत्यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा करून कसे यश पदरात पाडून घेतले.त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.कोरोना काळामध्ये ठाणे विभागातील समाज बांधवांना कशा प्रकारे मदत केली गेली,डॉक्टर आघाडी, वकील आघाडी,जनगणना यांचे समाजाला कसे फायदे होते तेही सविस्तर सांगितले.            

नाशिक विभागाचे महिला अध्यक्षा विद्याताई करपे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणार असे सांगितले.तसेच महिलांनी संघटित व्हावे असे आवाहन केले.             नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष  हरिभाऊ डोळसे यांनी आढावा घेताना गजानन (नाना) शेलार  व भूषण कर्डिले यांचे कार्याचा गुणगौरव केला.मागील वीस वर्षापासून हे संघटन करण्याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी कित्येक वेळा जाऊन संघटन करीत आहे.याचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढले.                          

विजयराव  दळवी यांनी आपल्या भाषणात मागील आठ महिन्यांमध्ये महानगरच्या सर्व कार्याचा आढावा घेतला.संघटनेच्या वाढीसाठी युवा आघाडी,महिला आघाडी,उद्योजक आघाडी,डॉक्टर आघाडी लवकरच स्थापन करून समाज कार्य पुढे नेतील.असे आश्वासन दिले.      

उपस्थितांपैकी अनेक पदाधिकार्‍यांनी त्यांचे मनोगत यावेळी मांडले. महानगर सचिव श्री विजय दळवी यांनी सर्वांचे आभार मानले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News