पुणे, कोल्हापूर सातारा रायगड सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,पालघर, ठाणे, आणि नाशिक या जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट


पुणे,  कोल्हापूर सातारा रायगड सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,पालघर, ठाणे, आणि नाशिक या जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

पुणे: आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यासह  नऊ  ठिकाणी ते मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे .पुणे ,कोल्हापुर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,पालघर, ठाणे, आणि नाशिक या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे .तर कोकण, ठाणे, नाशिक   जिल्ह्यात चार ऑगस्ट रोजी पाऊस पडणार आहे.

तर येत्या 5,आणि 6 ऑगस्ट रोजी राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.  4 ऑगस्ट रोजी रायगड ,रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल 7 ऑगस्ट रोजी रायगड ,आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

मुंबईत याच काळात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर भारतात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थनातील काही जिल्ह्यांना तर पावसानं झोडपून  काढलं आहे. त्यामुळे येथील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याठिकाणी आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News