भरत शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर


भरत शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे) कांबळेश्वर (ता.बारामती) येथील पथनाट्य, कीर्तन व वेबसिरीजच्या माध्यमातून मनोरंजन करणारे ग्रामीण कलाकार भरत पांडुरंग शिंदे ऊर्फ बाळासाहेब यांना नुकताच छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने हा गौरव करण्यात येणार आहे.

अस्सल ग्रामीण भाषाशेलीत तब्बल दोन तपाहून अधिक काळ रंगमंच गाजवत कांबळेशवर गावचे कलापथक मनोरंजनातून प्रबोधन करीत आहे. यातील भरत शिंदे हे हरहुन्नरी कलाकार आपल्या अभिनय शैलीतून रसिकांना खळखळून हसवतात. पथनाट्य, कीर्तन व चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या माध्यमातून कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बाळासाहेब यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याचे वितरण शुक्रवार (दि.६) मुंबई बांद्रा येथील रंगशारदा ऑडिटोरीयम मध्ये होणार आहे. संस्थेचे संस्थापक कल्याण जाणा व उपाध्यक्ष सोनम पाटील यांनी ही माहिती दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News