कोकण महापूर आपत्तीग्रस्तांना हडपसरवासीयांचा मदतीचा हात, स्मितसेवा फाउंडेशन च्या आवाहनाला मिळाला प्रतिसाद


कोकण महापूर आपत्तीग्रस्तांना हडपसरवासीयांचा मदतीचा हात, स्मितसेवा फाउंडेशन च्या आवाहनाला मिळाला प्रतिसाद

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : स्मितसेवा फाउंडेशनच्या आवाहनाला साथ देत कोकण पुन्हा उभा करण्यासाठी हडपसर भागातील बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला.

गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिक पुरात अडकून पडले असून त्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, अश्या संकटाच्या काळात आपण त्यांच्यासाठी मदत कार्य उभे करणे आवश्यक आहे. त्यासाठी  हडपसर परिसरातून शक्य तितकी मदत घेऊन या चळवळीमध्ये सहभागी होऊन आम्ही स्वराज कोकण संघटनेच्या मदतीने महाडमधील महाड शहर, भिरवाडी, संवाद, हावरे, पोलादपूर अशा ठिकाणी जीवनावश्यक वस्तू वाटून या योगदानात खारीचा वाटा उचलला.यामध्ये चांगले कपडे, रेशन किट, किराणा सामान, गव्हाच्या पीठाचे पुडे, औषधें, सुके खाण्याचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, बिस्कीटस,टूथ ब्रश, साबण, थोडीफार मिळालेली आर्थिक मदत ज्याचा साहाय्याने आम्ही 100 ब्लॅंकेटस विकत घेतले. असे सर्व सामान रविवारी कोकणातील विविध ठीकाणी वितरित केले,

यावेळी स्वराज्य कोकण संघटनेचे अध्यक्ष श्री प्रकाश यादव, सौ रोहिणी भुजबळ, स्मितसेवा फाउंडेशनचे उपाध्यक्षा सौ दर्शना डाके, कु.सावन व इतर सर्व पदाधिकारी व सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

उपक्रमाचे देणगीदार डाॅ. भालचंद्र  साठये, बाळासाहेब घुले, शशिकांत राऊत, नागेश साळुंके, नितीन भंडारी, संतोष भाटीया, रुपाली वर्मा, अनुराधा पावसकर, विभा राजन, अर्चना माने, प्रवीण कुलकर्णी, शर्मिला डांगमाळी, काशिनाथ भुजबळ, संगीता बोराटे, सोनल जैन, प्रमिला वाल्लेकर, सोमनाथ झेंडे, रूपाली पाटील, नूतन पासलकर, स्नेहा म्हेत्रे, विमल नवले, अशोक यादव, मिलिंद यादव, वृषाली जगदाळे, प्रिया जितकंर, वसंत कुंभार, इतर पदाधिकारी व सभासद यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News