ज्येष्ठ पखवाज वादक स्व. पं. गोविंद भिलारे यांना अनोखी आदरांजली


ज्येष्ठ पखवाज वादक स्व. पं. गोविंद भिलारे यांना अनोखी आदरांजली

पुणे : मृदुंगाचार्य शंकर वसंत फाऊंडेशन व स्व. पं. गोविंद भिलारे शिष्य परिवार यांच्या वतीने ज्येष्ठ पखवाज वादक स्व. पं. गोविंद भिलारे यांना "समर्पण" या कार्यक्रमाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. 

२ ऑगस्ट २०२० रोजी गोविंद भिलारे यांचे निधन झाले होते. त्यानिमित्ताने "समर्पण" या दहा दिवसीय ऑनलाईन कार्यक्रमात स्व. पं. गोविंद भिलारे यांच्या शिष्यांनी पखवाज वादन करताना त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रणव करंजकर, पांडूरंग भगत, नामदेव फड, पार्थ भूमकर, सुहास गवळी, गार्गी शेजवळ, ऋषिकेश उंडळकर, मनोज सोलंकी, तुषार परब, सुशील अंबुरे, ज्ञानेश्वर देशमुख, शशिकांत भोसले यांनी पखवाजचे आविष्कार सादर करताना आपल्या गुरूंना श्रद्धांजली अर्पण केली. समर्पण या कार्यक्रमाची सांगता श्रेया भिलारे व शिवतेज भिलारे यांच्या पखवाज जुगलबंदीने झाली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News