कोरोनाने काढले पुन्हा डोके वर,पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यात आयुष प्रसाद यांचे कडक निर्बंध करण्याचे आदेश


कोरोनाने काढले पुन्हा डोके वर,पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यात आयुष प्रसाद यांचे कडक निर्बंध करण्याचे आदेश

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: 

कोविड 19 या महामारीने जगात थैमान घातले आहे,दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिल, मे महिन्यात खूप लोकांना त्रास झाला, कितीतरी कोरोना पेशंट दगावले,परंतू जून जुलै महिन्यात परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथून कडक निर्बंध लावून कोरोना नियंत्रणात आला होता, परंतू या महामारीने पुन्हा डोके वर काढले असून ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, यामुळेच तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे, त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तहसीलदार, तलाठी ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी संपर्क साधून काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत, पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 42 गावे हॉट स्पॉट च्या दिशेने वाटचाल करीत आहेत, त्यामध्ये आंबेगाव,बारामती,दौंड,हवेली,इंदापूर, जुन्नर,खेड,मावळ,मुळशी या तालुक्यातील 42 गावामध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, 

आंबेगाव---जारकर वाडी,जवळे, वळती

बारामती ---चौधरवाडी,।मोरगाव

दौंड --केडगाव, लिंगाळी,वरवड,बेटवाडी,देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे,

हवेली--नऱ्हे

इंदापूर---बावडा,कळंब,माळवाडी,शेटफळगडे,हागर वाडी

जुन्नर ---अळू,बोरी सालवडी,(बोरीखुर्द),ढोलवड,,डिंगोरे, जलवंडी,मालवडी, पादीरवाडी,पिंपरी पेंढार, पूर,शिरोली तर्फे कुकुंदनेर

खेड -बिराडवाडी,खरपूड,कोपाळी

मावळ --भाजे,काल्हाट,साळुंब्रे,टाकवे खेर,

मुळशी --म्हारुंजी, सुस इत्यादी गावामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत,तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जनतेने शासनाने दिलेल्या कोरोना विषयी सर्वच नियमांचे पालन करावे आणि मी आणि माझे कुटुंब ही जबाबदारी पार पाडावी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News