पुणे सोलापूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीतील 3 आरोपी अटक, दौंड पोलिसांची दबंग कारवाई


पुणे सोलापूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीतील 3 आरोपी अटक, दौंड पोलिसांची दबंग कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी


- पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्याच्या हद्दीत खडकी रावणगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक केली असल्याची माहिती दाखल अंमलदार पो हवा सय्यद यांनी दिली आहे, पो नि नारायण पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत पक्की खबर मिळाली की खडकी रावणगावच्या काही जण संशयितरीत्या फिरत आहेत त्या माहिती द्वारे पो नि नारायण पवार यांनी तीन टीम तयार करून रावणगाव येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्त्यावर (सर्व्हिस रोड) पोलीस उभा करून सदर संशयित लोकांची शोधा शोध सुरू केली असता काटेरी झुडपाच्या आडबाजूला तीन दुचाकी आणि 6ते 7 लोक तिथे उभे असलेले दिसले,त्यांना पोलिसांचा सुगावा लागताच चार जण दुचाकी जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेऊन शेतात पसार झाले,तर इतर तिघेजण एका स्कुटीवर बसून इंदापुरच्या दिशेने पळू लागले, त्यांचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला,पोलीस जवळ येताना दिसताच या तिघांनी उसाच्या शेतात गाडी टाकून उड्या मारल्या स्वतः पो नि पवार यांनी एका आरोपीला पकडला, सर्व पोलिसांनी शेतात जाऊन त्यांना बाहेर काढले आणि त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडवा उडविची उत्तरे दिली, त्यांच्या गाडीची झडती घेतली असता डिकी मध्ये सतूर,कोयता,मिरचीची पुडी,पक्कड,वायर अशा दरोडा टाकण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याचेवर सरकारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे, गोरख मलगुंडे यांच्या फिर्यादीवरून गौरव भारत कुदळे वय 20राहणार भोईर नगर आकुर्डी पिंपरी चिंचवड, लाल्या उर्फ लव अंकूश भिसे वय 21 राहणार पंधरकर चाळ, दळवी नगर पिंपरी चिंचवड,महेश बाबुराव पाटील वय 20 राहणार बिरला हॉस्पिटल शेजारनगर दत्तनगर थेरगाव पुणे या तिघांवर भाग 5 गुन्हा रजिस्टर425/2011 भा द वि कलम 399,402 नुसार गुन्हा दाखल केला,पुढील तपास पो नि नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा श्रीरंग शिंदे करीत आहेत. या दबंग कारवाईमुळे दौंड शहरातून पो नि नारायण पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News