खडकवासला प्रकल्पात 98% तर पानशेत प्रकल्पात 97% पाणी भरले


खडकवासला प्रकल्पात 98% तर पानशेत प्रकल्पात 97% पाणी भरले

पुणे:पानशेत धरण 15.30 टीएमसी, म्हणजे  97टक्के भरले आहे तर वरसगाव धरण 92 टक्के ,आणि टेमघर धरण 94  टक्के भरले आहे .सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणात एकूण 29500 म्हणजे  98टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

दरम्यान खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला असून 7हजार 627 क्यूसेकने पाणी नदीत सोडले जात आहे .अशी माहिती खडकवासला धरण पाटविभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी माहिती दिली आहे. धरण परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. टेमघर धरणात 60 मीमी, वरसगाव मध्ये 78 मीमी, पानशेत मध्ये 56 मिमि, आणि खडकवासला धरण परिसरात 67मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. 3 हजार 530क्यूसेकने पाणी कालव्यात सोडले जात आहे. खडकवासला धरणात 4. 67 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. तर पानशेत मध्ये 15. 30 टी एमसीसी, वरसगाव मध्ये 12.69टीएमसी, आणि टेमघर मध्ये 6 .70 टीएमसी पाणी  उपलब्ध आहे..

अशी माहिती विजय पाटील यांनी दिली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News