पिंपळवाडी ता. पैठण येथील जमात-ए-उलेमा हिंद व सर्व धर्मीय नागरिकांकडून कोंकण पुरग्रस्तांना १५०० किलो धान्य व किराणा सामान इन्सानियत फाऊंडेशन शेवगाव कडे सुपुर्द.


पिंपळवाडी ता. पैठण येथील जमात-ए-उलेमा हिंद व सर्व धर्मीय नागरिकांकडून कोंकण पुरग्रस्तांना १५०० किलो धान्य व किराणा सामान इन्सानियत फाऊंडेशन शेवगाव कडे सुपुर्द.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव : येथील सामाजिक कार्य करणार्या इन्सानियत फाऊंडेशन शेवगाव या संगटनेने पुरग्रसतांच्या मदतीचे अवाहन केलेले आहे. या अवाहनास सर्व धर्मीय नागरिकांकडून खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या अवाहनास मान देवून पिंपळवाडी ता. पैठण येथील जमात-ए-उलेमा हिंद व स्थानिक सर्व धर्मीय नागरिकांनी आज दिनांक ०१/०८/२०२१ रोजी इन्सानियत फाऊंडेशन शेवगावचे अध्यक्ष श्री. इस्माईल भाई शेख व मौलाना मुख्तार हाफीज़ साहब यांचे कडे १५०० किलो गहू व तांदुळ तसेच गृहपयोगी किराणा सामान सुपुर्द केले. या प्रसंगी पिंपळवाडीचे मौलाना अजहर साहब, इन्सानियत फाऊंडेशनचे प्रेम भाऊ अंधारे, रियाज़ शेख,फिरोज भाई पटेल, आसिफ बेग, शफिक शेख व पिंपळवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.


    इन्सानियत फाऊंडेशन शेवगाव यांचे वतीने शफिक शेख यांनी जमाते-उलेमा-हिंद व पिंपळवाडीच्या ग्रामस्थांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News