"द जॉन हाँकिंग" सेंटरकडून शैक्षणिक योग्यतेच्या अंवल विद्यार्थ्यांचा सन्मान


"द जॉन हाँकिंग" सेंटरकडून  शैक्षणिक योग्यतेच्या अंवल विद्यार्थ्यांचा सन्मान

बाल्टीमोर, दि. 2 : "द जॉन हाँकिंग सेंटर फॉर टॅलेंन्टेड यूथ (CTY) यांचेकडून पुणे येथील अंजनेय राव याचा जगातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक म्हणून सन्मान करण्यात आला.

अंजनेय राव हा इंटरनॅशनल स्कूल येथे शिकत असून त्याने SAT, ACT यांसारख्या चाचण्यांमध्ये सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल CTY कडून सन्मान करण्यात आला आहे.

CTY कडून वरील चाचण्यांच्या निकालाचा वापर जगातील सर्वात प्रगतशील विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांची खरी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी केला जातो.

अंजनेय राव याने 84 देशांमधील 19 हजार विद्यार्थ्यांनी CTY च्या 2021 टॅलेंट सर्च या कार्यक्रमात भाग घेतला होता. यातील 20 टक्यां ्पेक्षा सहभागी विद्यार्थ्यांची निवड CTY हाय ऑनर्स पुरस्कारासाठी झाली होती. निवड झालेले विद्यार्थी CTY च्या ऑनलाईन आणि उन्हाळी कार्यक्रमासाठी पात्र झाले होते. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगभरातील इतर विद्यार्थ्यांशी शैक्षणीक आदान-प्रदान करण्याची संधी मिळत असते.

CTY च्या कार्यकारी संचालक व्हर्जिनिया रोश म्हणाल्या, निवड झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल आम्ही फार उत्साही आहोत. ज्या वर्षात आपल्या सगळयांना असामान्य घटनांना सामोरे जावे लागले, अशा वर्षी या विद्यार्थ्यांची शिकण्याची ओढ तळपत राहिली. हायस्कूल, कॉलेज आणि त्यांनतर आम्ही या विद्यार्थ्यांची प्रगती, विद्वान आणि चांगले नागरिक बनवण्यासाठी उत्साही आहोत. प्रत्येक वर्षी CTY च्या ऑनलाईन कार्यक्रम, अभ्यासक्रम यासाठी 15 हजार 500 हून अधिक नोंदणी होत असतात. त्याचबरोबर युनायटेड स्टेटस्‍ आणि हाँगकाँग मधील 20 ठिकाणी अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना CTY च्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News