कर्जत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी


कर्जत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी -  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्सव कर्जत शहरासह  उपनगरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी, पदाधिकारी व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जत येथील मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राजीव कर्जत शहरातील गांधी नगर, आण्णाभाऊ साठे नगर सह अनेक ठिकाणी आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, स पो नी सुरेश माने,  काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक सचिन घुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे , रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार,  सचिन कुलथे, अरविंद काळोखे, नगरसेविका उषा राऊत, डॉ शबनम इनामदार, निळकंठ ठोसर, संजय भिसे आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले यात प्रामुख्याने किशोर पवार, राजेंद्र पवार, संजय भिसे, तुकाराम पवार, विनोद पवार, प्रकाश आल्हाट, प्रभाकर पवार आदींनी मोठे परिश्रम घेतले. लोकशाहीर आण्णा भाऊसाठे यांचे विचार आचरणात आणले तर त्यांना अपेक्षित समाज घडेल, त्यांच्या विचारांचे प्रत्येकाने अनुकरण करावे असे आवाहन मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News