भगवंतांच्या नामस्मरणाने आपले जीवन सार्थकी लागते- पुजारी संगमनाथ महाराज


भगवंतांच्या नामस्मरणाने आपले जीवन सार्थकी लागते- पुजारी संगमनाथ महाराज

माळीवाडा पंच मंडळ देवस्थान व संत सावता महाराज उत्सव समितीच्यावतीने आयोजित "संत सावता महाराज सप्ताहा"चा शुभारंभ श्रीविशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उत्सव समिती प्रमुख छबुनाना जाधव, कैलास खरपुडे, सतीश डागवाले, सुभाष राऊत, चंद्रकांत ताठे, अशोकराव कापरे, सुनिल पडोळे, भाऊसाहेब पुंड, विजय सुडके, सोमनाथ नागापुरे, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, गजानन ससाणे, गणेश राऊत आदि. (छाया : राजु खरपुडे) 

 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) -  मनुष्याच्या जीवनात अनेक प्रकारची सुख-दु:ख येत असतात. आपली जीवननैय्या पार करण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण गरजेचे आहे. याबाबत आपल्या संतांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चाललो तर आपले जीवन सार्थक होईल. संत सावता महाराजांनी आपल्या कामातच दैवत मानून भगवंतांचे कायम नामस्मरण करत. त्यांच्या नि:स्सीम भक्तीवर भगवंतही प्रसन्न होते. मनुष्यानेही नेहमी भगवंतांचे नामस्मरण करुन आपले जीवन सार्थकी लावावे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांनी केले.


     माळीवाडा पंच मंडळ देवस्थान व संत सावता महाराज उत्सव समितीच्यावतीने आयोजित ‘संत सावता महाराज सप्ताहा’चा शुभारंभ श्रीविशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उत्सव समिती प्रमुख छबुनाना जाधव, कैलास खरपुडे, सतीश डागवाले, सुभाष राऊत, चंद्रकांत ताठे, अशोकराव कापरे, सुनिल पडोळे, भाऊसाहेब पुंड, अण्णा ढवळे, विजय सुडके, सोमनाथ नागापुरे, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, गजानन ससाणे, गणेश राऊत आदि उपस्थित होते. याप्रसंगी उत्सव समितीचे प्रमुख छबुनाना जाधव म्हणाले, दरवर्षी श्री संत सावता महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य सप्ताहाचे आयोजन करुन महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, प्रवचनकार  यांच्या सेवेचा लाभ नागरिकांना देत असतो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सप्ताह हा मोजक्याच भाविकांचा उपस्थित करत आहोत. यंदाही सप्ताहात खंड पडू न देता आयोजन करण्यात आले आहे. लवकरच भगवंत या कोरोना महामारीतून आपली सुटका करेल, त्यानंतर भव्य स्वरुपात सप्ताहाचे आयोजन करु, असे सांगितले. प्रारंभी श्री सावता महाराजांच्या मूर्तीचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विणा पुजन, अभिषेक, आरती अशा कार्यक्रमांनी सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.


                        

जाहिरात
Search
विडिओ
Recent News