महापुराच्या संकटात माणुसकीचा व मदतीचा ही महापूर - आ. चंद्रकांतदादा पाटील


महापुराच्या संकटात माणुसकीचा व मदतीचा ही महापूर - आ. चंद्रकांतदादा पाटील

मुकुलमाधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने एक हात मदतीचापुणे:कोकणातील भीषण पूरपरिस्थितीत ही कोकणवासी धैर्याने ह्या संकटाचा सामना करत आहेत, शासनाने त्वरित मदत द्यावी ही आमची मागणी असून त्याबाबत चे विस्तृत पत्र ही राज्य सरकारला दिले आहे मात्र शासकीय मदत येण्यापूर्वीच भाजप च्या वतीने मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरु केले असून आज विविध जीवनावश्यक साहित्यासह अठरावा ट्रक (18 वा ) साहित्य घेऊन महाड ला रवाना केला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनानुसार मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने आज महाड येथे पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुलमाधव फाउंडेशन चे जितेंद्र जाधव, ज्येष्ठ नेते शिवरामभाऊ मेंगडे, सरचिटणीस विठ्ठल बराटे, बाळासाहेब धनवे, अमोल डांगे, जनार्दन क्षीरसागर,नरके, सचिन दांगट, डॉ. तेजस्वी गोळे, रुपालीताई मगर,रामदास गावडे,धनंजय रसाळ, रुपेश भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.आठवड्याभरात पुण्यातूनच नव्हे तर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असून भाजप चे राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते कोकण, कोल्हापूर, सांगली व इतर ठिकाणी मदतीला धावून गेले आहेत. या अस्मानी संकटात माणुसकीचा आणि मदतीचा महापूर देखील बघायला मिळत असून सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था असे सर्वच मदतीला तत्पर झाल्याचे चित्र असून हीच आपली संस्कृती असल्याचे ही आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आवर्जून नमूद केले.औषधे,पाण्याच्या टाक्या, शिधा असे विविध साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविले जात असून मदतीसाठी स्वयंसेवक व डॉक्टर्स देखील पाठवत आहोत, तसेच रोगराई पसरू नये म्हणून निरजंतूकीकरणाचे साहित्य (औषधं, रसायन ) देखील पाठविले असल्याचे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. पूरग्रस्तांना नेमके काय आवश्यक आहे याचा अभ्यास करून साहित्य पाठवत आहोत असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. आजच्या किट मधे ब्लॅंकेट, बॅग, शाल, रेनकोट, बेडशीट यासह किराणा माल व इतर साहित्य पाठवत असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले. आ. चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण समिती अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर, शिवरामभाऊ मेंगडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून साहित्य रवाना करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर मुकुलमाधव फाउंडेशन च्या वतीने जितेंद्र जाधव यांनी संयोजन सहाय्य व साहित्य नियोजन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News