बिबवे वाडीतल्या युवा नेतृत्वाची माणुसकी! चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी ट्रक भर साहित्य रवाना


बिबवे वाडीतल्या युवा नेतृत्वाची माणुसकी! चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी ट्रक भर साहित्य रवाना

पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली आणि कोल्हापूर तसेच कोकणातील महाड ,तळीये, आणि चिपळूण अन्य भागातील पूरग्रस्त नागरिकांना राज्यभरातून विविध नागरीक, सामाजिक संस्था यांच्याकडून मदत सुरू आहे.


बिबवेवाडी भागातील युवा नेतृत्व चौगुले यांच्या पुढाकारातून चिपळूणच्या पूर ग्रस्तांसाठी ट्रक भर गरजेचे साहित्य रवाना करण्यात आले.

व्यावसायिक प्रीतम शहा यांच्या हस्ते  श्रीफळ वाढून हा ट्रक पूरग्रस्तांसाठी चिपळूण कडे रवाना करण्यात आला.

यावेळी दर्शन गंगावणे ,अभिजित पवार, प्रीतम शिखरे स्वप्निल घाटे, ऋषभ राऊत, युवराज चिकणे, शांतनु गोड, ओमकार कांटे, तन्मय कवडे, समीर घाटे, प्रसाद वाफगावकर उपस्थित होते.

आज महेश सोसायटी मित्र मंडळ व मार्केट यार्ड गणेश उत्सव समिती मंडळ मधील कार्यकर्ते ही सर्व मदत स्वतः हा जाऊन चिपळूण मधील पूरग्रस्तांना कडे सुपूर्द करणार आहेत. या साहित्य मध्ये 5 ते 15 वयोगटातील लहान मुलांसाठी नवीन कपडे, व जॉकीग, जीवनावश्यक साहित्याचे किट, बिस्किट, आणि पिण्याच्या बाटल्यांचे बॉक्स आहेत. गौरव घुले म्हणाले कोकणात मोठा कोकणी समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.

त्यांच्या वाचाया वर्तमानपत्र व टीव्ही चॅनलवर बघितल्या नंतर संकटात असलेल्या आपल्या समाज बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील दानशूर व्यक्ती मित्रपरिवार आणि आपण स्वतः यात योगदान दिले असल्याचे गौरव घुले यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News