कोविड काळात उत्कृष्ट कामाची पुणे टाइम्स मिरर ने घेतली दखल,पो नि नारायण पवार यांना पुणे येथे पुरस्कार प्रदान..


कोविड काळात उत्कृष्ट कामाची पुणे टाइम्स मिरर ने घेतली दखल,पो नि नारायण पवार यांना पुणे येथे पुरस्कार प्रदान..

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कोविड काळात पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे नातेवाईक,तसेच मजूर,कामगार जनता यांची  प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून योग्य ती काळजी घेऊन या महामारी मध्ये लोकांचे संरक्षण आणि त्यांना मोलाचा आधार देऊन उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल पुणे टाइम्स मिरर यांचेकडून त्यांचा कोविड योद्धा म्हणून नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ही दौंड करांसाठी अभिमानाची बाब आहे,त्यांच्या या कार्याची दखल पुणे टाइम्स मिरर ने घेतली आहे, कोरोनाच्या काळात पोलिस निरीक्षक नारायण पवार हे जिल्हा विशेष शाखा येथे पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूकिस होते.

त्या ठिकाणी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांची जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली त्या काळामध्ये सर्व जनता भयभीत झाली होती अचानक लॉक डाऊन जारी करण्यात आला होता.

अशा काळामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची सुरक्षा त्यांना औषध पोहोच करणे त्यांना यंत्रसामुग्री तसेच सेनी टायझर मास्क पी. पी.इ कीट अशी साधने पुरवठा करणे प्रत्येक पोलीस स्टेशनला मनुष्यबळ पुरवठा करणे,तसेच जिल्ह्यात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्याचे आदेश देणे,कारवाई करून घेणे तसेच अडकलेले मजूर कामगार यासाठी कॅम्पची व्यवस्था करणे,त्यांची जेवणाची सोय करणे,लोकांची जाण्याची व्यवस्था करणे त्यांना राहण्याची व्यवस्था करणे,ऑनलाईन पासेस सर्व जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसाठी पुरवठा करणे अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करणे तसेच जिल्ह्यासाठी लागणारा ऑक्सिजन बाहेरून सर्व जिल्ह्यातील केंद्रावर पुरवठा करणे तसेच ऊसतोड कामगार, मजूर यांची राहण्याची व्यवस्था करणे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी यांना  कोरोना  झाला आहे अशांना दवाखान्यात बेडची व्यवस्था करणे त्यांच्या नातेवाईकांना बेडची व्यवस्था करणे, गोळ्या औषध पुरवणे, धीर देणे, आधार देणे अशा पद्धतीची गरजेच्या वेळी मोलाची  कामगीरी केली.

त्यांच्या या कामाची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी  घेऊन पुणे टाइम्स मिरर अवार्ड साठी शिफारस केली होती सदरचा अवार्ड त्यांना आज रोजी माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक नारायण पवार  यांना यापूर्वी देखील आशा चांगल्या कामगिरीचे अनेक अवॉर्ड प्राप्त झालेले आहेत गडचिरोली जिल्ह्यात सेवा बजावलेली आहे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक वेळा प्रशंशा पत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहे

तसेच दौंड शहर व तालुक्यात गुंडगिरी अवैध धंदे यांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार हे चांगली कामगिरी बजावत आहेत.

तसेच गल्लोगल्ली मधील भाईगिरी असो व तालुक्यात होत असलेल्या दंगा यावर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे व करत आहेत ,उत्कृष्ट कामगिरीची दखल पुणे टाइम्स मिरर यांनीही घेतली उत्कृष्ट कामगिरी कामगिरी बजावली असल्याने गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुणे टाइम्स मिरर अवार्ड यांचेकडून कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे दौंड शहरासह तालुक्यातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News