पूरग्रस्तांना भाजपा दक्षिण आघाडीची मदत


पूरग्रस्तांना भाजपा दक्षिण आघाडीची मदत

भाजपच्या पूरग्रस्त मदत संकलनात आज पक्षाच्या दक्षिण भारतीय आघाडीने मोठी मदत शहर कार्यालयाकडे जमा केली. दक्षिण भारतीय आघाडीचे शहर अध्यक्ष मा. श्री. मनोजजी पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी यात मोलाचे काम केले. 

भाजपा शहराध्यक्ष मा. श्री. जगदीशजी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातून कोकणातील पूरग्रस्त बांधवांना ही मदत पाठविली जात आहे. माझ्यासोबत या वेळी शिवाजीनगर विधानसभा सरचिटणीस मा. गणेशजी बगाडे, युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, जितेंद्र गायकवाड, योगेश केरकर, सुनील दैठणकर, विजय आळतेकर, अनिल माने आदी सहकारी उपस्थित होते. 

विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितल्याप्रमाणे पूरग्रस्तांच्या मदतीत भाजपा कार्यकर्ते झोकून देऊन काम करतील आणि पूरग्रस्त भागाची काळजी घेतील. त्यानुसार संपूर्ण पुणे शहरात या मदतीच्या वस्तूंचे संकलन सुरू करण्यात आले आहे. 

सुनील माने

शहर समन्वयक, पूरग्रस्त मदत कक्ष, भाजपा पुणे

पुणे शहर चिटणीस

१ ॲागस्ट २०२१

जाहिरात
Search
विडिओ
Recent News