वेळेच्या बंधनाविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी पुण्यात घंटानाद आंदोलन पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत झाला निर्णय


वेळेच्या बंधनाविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी पुण्यात घंटानाद आंदोलन पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत झाला निर्णय

पुणे: शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गांमध्ये प्रचंड असंतोष आहे याच पातळीवर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा यासाठी येत्या मंगळवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 12.15 दरम्यान पुणे शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनानंतर  दुकानाच्या वेळा वाढविण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही. तर बुधवार चार ऑगस्ट पासून पुणे शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत ठेवण्यात येतील. असा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आल्याची

माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.

महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 31 जुलै रोजी पार पडल्यानंतर त्यांना व त्यांना निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघातर्फे देण्यात आली .

5 एप्रिल 2021 पासून महाराष्ट्रात मिनी लॉक डाउन करण्याचा निर्णय झाला मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने संपूर्ण   मात्र परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेत सरकारने संपूर्ण लॉक डाऊन करीत परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी आमची व्यापारी महासंघाने मागणी केली होती.

सरकारने ती मान्य केली नाही मात्र तरीही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने 5 एप्रिल ते 31 मे 2021 दरम्यान बाजारपेठा संपूर्ण बंद ठेवत सरकारला मदत केली  असे असून देखील  की मागील चार महिन्यात पुणे शहरात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना व रुग्ण संख्या सातत्याने कमी होत असताना. देखील व्यवसायांच्या वेळामध्ये  सरकारने कोणत्या प्रकारची शिथीलता देण्याचा निर्णय घेतलेला नाही ही बाब व्यापाऱ्यांचे दृष्टीने निराशाजनक आहे.

पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम सुधीर करण्याचा विकेंड लॉक डॉऊन मधून शनिवार वगळण्याचा निर्णय पुढील दोन दिवसात घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार ,आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले होते .मात्र महापालिका आयुक्तांनी शहरातील  कोरोना प्रतिबंधक नियम जैसे राहतील असा आदेश काढला आहे ते म्हणजे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे प्रशासनाने सध्याच्या दुकान उघडण्याच्या वेळा सकाळी 7ते 4 ऐवजी सकाळी 10  ते रात्री 8 कशा कराव्यात आणि शनिवारी हिंदी के दुकाने चालू ठेवण्याची मुभा द्यावी जेणेकरून  व्यापार यांबरोबर ग्राहकांची देखील सोय होऊ शकेल अशी पुणे व्यापारी महासंघाचे प्रमुख मागणी असल्याचेही रांका यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की सरकारी खाजगी कार्यालय कारखाने सुरू असून सायंकाळी 5 नंतर बंद असून देखील खाद्यपदार्थ व रस्त्यावरील इतर गर्दी मात्र तशीच आहे यावर कोणाचेही नियंत्रण नाही .उलट नियम पाळत आपल्यावर बंद होणार व्यापारी हजार कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर्ज, व्याजाचे हप्ते, कर ,वीज बिले, घरखर्च या बाबी सांभाळीत आर्थिक संकटात सापडला आहे.

या संकट काळात सरकारकडून कोणती मदत सोडत सहकार्य देखील मिळत नसल्याने व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे .त्यामुळे आंदोलनाशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसून सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी आमची त्यांना विनंती आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News