कर्जत येथील श्री. संत गोदड महाराजांची रथ यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द


कर्जत येथील श्री. संत गोदड महाराजांची रथ यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द

प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यात्रा  कमीटीच्या बैठकीत निर्णय. 

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - 

                         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या कर्जत येथील  ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आली असून कर्जत मधे दि ३, ४ आणि ५ रोजी  शहरात कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येऊन लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. तसेच कर्जत शहरात येणारे सर्व रस्त्यावर कडक नाकाबंदी करून या चेकपोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. तरी सर्वसामान्य नागरिकांनी या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले. त्या प्रशासनाने आयोजित केलेल्या श्री. संत सदगुरु गोदड महाराज यात्रा शांतता समितीच्या बैठक प्रसंगी बोलत होत्या . या बैठकीस तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक गटविकास अधिकारी रुपचंद जगताप, अशोक नरोड, गुप्तवार्ताचे मनोज लातुरकर यांच्यासह गोदड महाराज यात्रा कमिटीचे सदस्य, पुजारी, सेवेकरी, मानकरी, आणि राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

  सालाबाद प्रमाणे दिनांक ४ ऑगस्ट बुधवार रोजी कामिका एकादशी दिवशी कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांची मोठी यात्रा कर्जत शहरात भरते. मात्र यंदा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कर्जत शहरासह  तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या पाहता संत सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव यात्रा सर्वांच्या सहमतीने आणि शासनाच्या नियमानुसार रद्द करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिली. यावेळी बुधवारी संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात परंपरे अनुसार अभिषेक आणि पुजा मोजक्याच पुजारी आणि सेवेकरींच्या हस्ते पार पडेल अशी ग्वाही उपस्थित यात्रा कमिटीच्या सदस्यांनी तालुका प्रशासनास दिली. यात्रा काळात दिनांक ३, ४ आणि ५ रोजी कर्जत शहरात कडक जनता कर्फ्यू आणि कडक लॉकडाऊन तालुका प्रशासनाने जाहीर केला असून या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी बाहेर पडू नये असा निर्णय घेण्यात आला आहे. जर कोणी बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला असून या दीवशी कर्जत शहरात प्रवेश करत असणाऱ्या आक्काबाईनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ईदगाह मैदान, कोरेगाव रोड आणि कापरेवाडी वेस या पाच ठिकाणी कडक नाकेबंदी करण्यात येणार असून त्यामुळे बाहेरील व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश नाकारला जाईल.                                यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, यात्रा कमिटीचे मेघराज पाटील, अभय (आबा) पाटील, सुरेश खिस्ती, सुरेश काकडे, संतोष नलवडे, तानाजी पाटील, अमोल सोनमाली, अनिल गदादे, हभप दत्तात्रय शिंदे आदींनी सुचना मांडत त्यावर प्रशासनाने अमलबाजवणी करण्याची विनंती केली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाने आपल्या घरीच महाराजांच्या प्रतिमेची पुजा करून दर्शन घ्यावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.       या बैठकीस पंढरीनाथ काकडे, ज्ञानदेव काकडे, संतोष मेहेत्रे, शहाजी नलवडे, सुनील नेवसे, काकासाहेब धांडे, बिभीषण खोसे, महेश जेवरे, तात्यासाहेब ढेरे, प्रदीप पाटील, काका लांगोरे, सतीश (काका) पाटील, गजानन फलके, तात्यासाहेब क्षीरसागर, शरीफ पठाण, बप्पाजी धांडे, संजय काकडे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News