सोमेश्वर येथे "भारतीय पत्रकार संघा"ची त्रै-मासिक बैठक संपन्न..


सोमेश्वर येथे "भारतीय पत्रकार संघा"ची त्रै-मासिक  बैठक संपन्न..

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) सोमेश्वर (ता.बारामती) येथील मंदिर परिसरात रविवार दि.०१ ऑगस्ट रोजी भारतीय पत्रकार संघाची त्रै-मासिक बैठक घेण्यात आली. यावेळी भारतीय पत्रकार संघटना नवीन सभासद नोंदणी तसेच काही सामाजिक विधायक कामाबाबतच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.


    याप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांनी पुढील काळात भारतीय पत्रकार संघ वाढ व सामाजिक उपक्रम राबवत संघाचे नाव उंचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

      यावेळी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका उपाध्यक्ष विनोद गोलांडे, सचिव सोमनाथ लोणकर, कायदेशीर सल्लागार अँड. गणेश आळंदीकर, संघटक महंमद शेख, हल्ला कृती समिती प्रमुख निखिल नाटकर, सहसचिव संतोष भोसले, संजय कुंभार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News