श्रीगोंदेकरांची ऑलंपिकवीरांच्या आई वडील शिक्षकास सलामी


श्रीगोंदेकरांची ऑलंपिकवीरांच्या आई वडील शिक्षकास सलामी

अग्नीपंखची 80 किमी ची सायकल वारी 

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी

श्रीगोंदा = श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा ते मांडवा (ता आष्टी) 80 किमीची प्रेरणा सायकल वारी काढून मांडवा  येथील ऑलंपीयन खेळाडू अविनाश साबळे यांच्या आई वडीलांना सलाम केला. यावेळी अविनाशच्या आई वडील  व शिक्षक जमीर सय्यद यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरारळले 

मांडवा येथील अविनाश साबळे हा विट भट्टीवर काम करणाऱ्या मांडवा येथील  एका मजुराचा मुलगा असुन अवीनाश साबळे याने टोकियो सुरु असलेल्या  ऑलंपिक स्पर्धेत 3000 ट्रीपल चेस मध्ये नॅशनल रेकॉर्ड केले या खेळात पुरुष गटात अविनाश रुपाने भारताला ऑलंपिक मध्ये उतरण्याची संधी मिळाली हे विशेष आहे

सायकल वारीस श्रीगोंद्यात राष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फंड सोनाली मंडलिक धनश्री फंड पल्लवी पोटफोडे सिध्दी शिंदे साक्षी इंगळे यांनी प्रस्थान झेंडा दाखविला. सायकल वारीचे श्रीगोंदा येथे नगरसेवक संग्राम घोडके आढळगाव येथे सरपंच शिवप्रसाद उबाळे शरद जमदाडे रुईगव्हाण फाट्यावर जामदार सर चांदे येथे हभप सुद्रिक मिरजगाव येथे सरपंच तर आष्टी येथे पोलिस उपाधीक्षक विजय लगारे अॅड विजयराव ढोबळे यांनी  भोजनाची व्यवस्था केली कडा येथे ए के शिंदे यांनी स्वागत केले. 


धावता धावता ..अविनाश धावत होता 

अविनाश लहानपणी शाळेत जाण्यासाठी धावत होता त्याला खाण्यास सकस अन्न नव्हते पण जिद्द होती तो भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून भरती झाला आणि टोकियो आॅलपिक मध्ये धावला याचा खुप अभिमान वाटला. मांडवेचे सरपंच अशोक मुटकुले यांनी आभार मानले 


वैशाली व मुकुंद साबळे 

अविनाश आई वडील


सहभागी सायकलपटू 

 श्रावणी जगताप ऋतुपर्ण साळवे रोहीत वऱ्हाडे कृष्णा साळवे वेदांत दरेकर वेदांत दरेकर आदित्य वाजे श्रीराम जगताप हे बालवीर तसेच 

प्रतिभा गांधी, संगीता इंगळे, मनिषा काकडे, शहाजी खेतमाळीस, लालासाहेब काकडे, दत्ताजी जगताप, नवनाथ दरेकर, संपत इधाटे  मच्छिंद्र सुपेकर, तुषार शिंदे, श्रीयद लोड, महारुद्र तांबे, अमोल गव्हाणे, चंदन घोडके, अंकुश तुपे, अजय गाडेकर, अमोल साळवे, विजय पवार

- अविनाश च्या रूपाने भारताला  ऑलिंपिक सारख्या खेळामध्ये उतरण्याची संधी मिळाली पण या गरीबाच्या मुलाच्या जाग्यावर एखाद्या पाटलाचा मुलगा असता किंवा नेत्याचा  किंवा पैसे वाल्याचा मुलगा असता तर इथून तिथून बीड जिल्ह्यात बॅनरबाजी झाली असती  तसे पाहता महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील  दिग्गज नेते दिग्गज नेते मुंडे व धस यांचे साधे या मुलाचे किंवा त्या चा  आई  वडीलाचे  साधा सत्कार  करण्याची तसदी घेतली नाही खेदाची बाब आहे. अग्निपंख फाऊंडेशनचे बाळासाहेब काकडे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News