मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्र भेट हा एक योगायोग होता- नाना पटोले


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्र भेट हा एक योगायोग होता- नाना पटोले

पुणे:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्र भेट हा एक योगायोग होता.हि वेळ राजकारणाची नाही.जासुसी करणं आमचं काम नाही. तर केंद्राच काम आहे.लोकांची प्रायवेसी संपवली आहे.जासुसी करण्याचा काम केंद्राकडून सुरु आहे.एवढी मोठी घटना घडूनही लोकसभेत कोणीही बोलायला तयार नाही.आमचं काम हे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करणं आहे.ना की कोण कोणाला भेटलं याबाबत जासुसी करणे आहे.असं ही यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं.कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूर आल्याने तेथील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज  शहरातून  ८० कार्यकते  पूरग्रस्त भागात मदत घेऊन गेले.


सारसबाग पुणे येथे या काँग्रेसच्या मदत पथकाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून निरोप दिला.त्या वेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते

मध्यप्रदेश आणि कर्नाटक येथील सरकार ब्लॅकमेलिंग करून यांनीच पाळलं आहे.हे हि सिद्ध झालं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी एकही शब्द बोलायला तयार नाहीये.हेच खऱ्या अर्थाने चोर के दाढी मे तिनका आहे.दाढी कोणाची आहे हे आपल्याला माहीतच आहे.अश्या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टिका केली आहे.

काँग्रेस नगरसेवक आबा बागूल यांच्या नेतृत्वात 80 लोकांची टिम हि पूरग्रस्त भागतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी तसेच तेथे जाऊन साफसफाई करण्यासाठी येणार आहे.तसेच पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण येथे हि काँग्रेस पक्षातर्फे मदत करण्यात येत आहे.फक्त याचा कोणत्याही प्रकारे गाजाबाजा केला जात नाहीये.कारण ही मदत आहे.अडचणीत आलेल्या लोकांना अडचणीतून बाहेर काढण्याचा हा मार्ग आहे.सेवा हा काँग्रेस पक्षाचा मूळ धर्म आहे.आणि त्यातून ही मदत केली जात आहे.ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे जे काही संकट आज महाराष्ट्रावर आलं आहे त्यासाठी राज्य सरकार भरीव मदत करत आहे.पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने जे काही राजकारण करण्यात येत आहे ते चुकीचं असून यात राजकारण न करता सर्वांनी एकत्र यायला हवं.केंद्राकडून काहीही मदत होत नाहीये तरीही राज्य सरकार लोकांना मदत करत आहे.आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याला कसं पूढे नेहेता येईल. यासाठी महाविकास आघाडी सरकार काम कारत आहे.असं यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं.देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, त्यांनाच बदनाम केलं नाना पटोले

पुणे:  कधीही देशावर हल्ला होऊ शकतो. चीन कधीही हल्ला करेल, त्याबाबत मोदी बोलत नाहीत.  माध्यमांनी आता काही लिहिलं तर केंद्र त्यांना नोटीस पाठवते, कारवाई करते.   तेव्हा हुकूमशाही होती, आताही झाली.  

इंग्रजांचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये काहीही बदल राहिला नाही.   त्यावेळी राजीव गांधींची मोठी बदनामी केली गेली.   देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, त्यांनाच बदनाम केलं असं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. पटोले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. आज पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. 

काही लोक दिल्लीत माझ्याबद्दल तक्रार करतात

पटोले म्हणाले की,  संविधानाने मला दिलेला अधिकार हिरावला जातोय .   मी जहाल आहे असं म्हणतात. 

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल राज्यपाल बोलले.  देशाचं वाटोळं नेहरू यांच्यामुळे झालं असं ते बोलले.  राज्यपाल पदावर बसून राजकारण करता येत नाही . राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे, राज्यपाल  भाजप कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. विधानसभेतही मी हे बोललो आहे, असं ते म्हणाले. 

न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्थेची केंद्र सरकारने काय अवस्था करून ठेवली आहे. IAS, IPS लोक राजीनामा देताय, कंटाळून नोकऱ्या सोडत आहेत. एक जण मला भेटला आणि मुस्लिम असल्यानं मला चांगली वागणूक दिली जात नाही असं म्हटला. चांगलं काम करूनही टॉर्चर केलं जातंय.  काहीही सांगायचा अधिकार राहिला नाही, असं पटोले म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News