श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी येथे आरोग्य अधिकारी यांची अजुन गावाला भेट झाली नाही


श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी येथे आरोग्य अधिकारी यांची अजुन गावाला भेट झाली नाही

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी

 तालुक्यातील चोराचीवाडी येथे कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या  प्रमाणात वाढले तरी आरोग्य विभागाचे गावात दुर्लक्ष होत असल्याचे माहिती  माजी सरपंच  तुकाराम चव्हाण यांनी सांगितले तालुक्यातील चोराचीवाडी गावाची लोकसंख्या दिड हजार असताना गावात आज अखेर ६० ते ६५ कोरोनाचे रुग्ण पाॕजिव्ह असुन ते तालुका व जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन दिवसात कोरोनामुळे दोन व्यक्तीचे निधन झाले. तरी गावात ज्या काही उपाययोजना  करायला पाहिजे त्या ग्रामपंचायतीकडून होताना दिसत नाही. तालुक्यातील सर्व गावात लसीकरण मोहिम चालु असताना गावात अजुन लसीकरण का नाही. कमी लोकसंख्या असलेल्या  गावात पेंशट जास्त असताना  आरोग्य अधिकारी यांची अजुन गावाला भेट झाली नाही .  गावातील लोक मेल्यावर आरोग्य विभाग जागे होवून उपचार करणार का  संपूर्ण गावात ग्रामपंचायतीने जनजागृती करुण मास्क सॕनिटायझर वाटप फवारणी करुण घरोघरी जावून लोकांना टॕबलेट दिले पाहिजे. आणि  तालुका आरोग्य विभागाने यांची गाभीर्याने दखल घ्यावी अन्यथा मोठा अनर्थ होईल यासाठी वरीष्ठ पातळी वरील  अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी तुकाराम चव्हाण यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News