ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना कारखाना कारभाराची पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांचा विश्वास आहे


ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना कारखाना कारभाराची पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांचा विश्वास आहे

श्रीगोंदा, अंकुश तुपे प्रतिनिधी:  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर लि. च्या सन २०२०-२१ या गाळप हंगामात गळीत केले ऊस बिलापोटी रु- २००/- प्र.मे. टन याप्रमाणे दुसरा हप्ता दि. २.८.२०२१ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणेत येत असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नागवडे म्हणाले की, सन २०२०-२१ या गळीत हंगामात कारखान्याने रू.२१००/- प्र. मे.टन याप्रमाणे पहिला हप्ता वेळेत शेतकऱ्यांना दिलेला आहे. उर्वरीत अंतीम पेमेंट ऊस उत्पादकांना त्वरीत अदा करणेत येईल. त्याची तरतुद करण्यात आलेली आहे.

कारखान्याच्या आर्थिक अडचणींबाबत काही लोकांकडून हेतूपुरस्सर चुकीच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात. परंतु सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना कारखाना कारभाराची पुर्ण खात्री असलेमुळे त्यांचा विश्वास आहे. स्वर्गीय बापूंच्या विचाराने व संस्काराने कारखान्याची वाटचाल चालू असल्यामुळे सभासद संचालक मंडळ शेतकऱ्यांचा विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे १४ कोटी रुपयांचे ऊस पेमेंट वर्ग करणेत येत आहे.

नागवडे कारखान्याने सन २०२०-२१ गळीत हंगामामधील ऊस तोड वहातुक मजूर व मुकादमांचे बक्षिस व कमिशन सह सर्व पेमेंट रक्‍कम रु. १६.५४ कोटी अदा कलेले असुन कामगारांचे पगारही नियमीत होत आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालवून जास्तीत जास्त गाळप करणार आहे. त्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही. त्यामुळे कारखान्याच्या कारभाराबाबत कुणीही चिंता करु नये असे श्री. नागवडे यांनी म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News