दोन वर्षापासुन मोक्‍काचे गुन्हयातील फरार आरोपी श्रीगोंदा पोलीसांच्या जाळ्यात.


दोन वर्षापासुन मोक्‍काचे गुन्हयातील फरार आरोपी श्रीगोंदा पोलीसांच्या जाळ्यात.

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी : दि.30/07/2021 रोजी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपी लल्या हरदास भोसले रा.गणेगाव

ता.शिरुर जि.पुणे हा कुळधरण ता.कर्जत येथे आला आहे.त्यावरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या

अधिकारी व अंमलदार यांना कोंबिग करण्याचे सुचना दिले त्या वरुन कुळधरण शिवारात ता. कर्जत येथे आज  दि. 30/07/2021 रोजी 05.00 ते 7.00 वा. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील सराईत आरोपी १) लल्या हरदास भोसले वय ३५ वर्षे रा. गणेगाव ता.शिरूर जि. पुणे हा कुळधरण येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. लल्या हरदास भोसले वय 35 वर्षे,रा.गणेगाव ता.शिरुर जि.पुणे हा शिरुर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.103/2019 भा.द.वि.क.420,327,336,323,143,149,प्रमाणे गुन्ह्यात त्याचे साथीदारांसह मोक्का का.क.3(1(2),3(4) गुन्ह्यात दोन वर्षापासुन अद्याप पावेतो फरार होता. त्याच प्रमाणे श्रीमती नाजुका माळशिखऱ्या भोसले रा. राहींजवाडी काष्टी ता. श्रीगोंदा यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन सदर आरोपी विरोधात श्रीगोंदा येथे गु.र.नं. 305/2018 क 307,324,323,504,143,149 प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये त्याचे साथीदारांना अटक करण्यात आली होती परंतु सदरचा आरोपी हा नमुद गुन्हा दाखल झाल्यापासुन पोलीसांना गुंगारा देत होता. सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर दाखल गुन्हे खालील प्रमाणे 

1) शिरुर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.103/2019 भा.द.वि.क.420,327,336,323,143,149 मोक्का

का.क.3(1(2),3(4) (फरार)


2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 305/2018 भा.द.वि 307,324,323,504,143,149

(फरार)


3) शिरुर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.382/2010 भा.द.वि.क.302,344,439वगैरे


4) शिरुर पोलीस स्टेशन गु.रणजि.नं.167/2004 भा.द.वि.क.379 वगैरे


5) दौंड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 144/2011 भा.द.वि 457,380वगैरे


6) सासवड पोलीस स्टेशन गु.रजि.नं.99/2010 भा.द.वि.क.457 380, 461वगैरे

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील साहेब,मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव साहेब,यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामराव ढिकले ,सपोनि दिलीप तेजनकर,सफौ अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, , पोकॉ दादा टाके यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News