दौंड शहरात धूम स्टाईल गळ्यातील चैन चोरी,चैन चोरीचे लोन दौंड शहरात


दौंड शहरात धूम स्टाईल गळ्यातील चैन चोरी,चैन चोरीचे लोन दौंड शहरात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहरातील रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवर चाललेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन (साखळी) हिसकावून चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे ठाणेअमलदार अमीर शेख यांनी दिली आहे, फिर्यादी सौ संजना विजय नानवानी वय 49 वर्ष राहणार कुंभार गल्ली दौंड या त्यांचे पती विजय दादूराम नानवानी हे दोघेजण काही कामानिमित्त गोपाळवाडी रोड सरपंच वस्ती येथे गेले होते, येताना ते जवळच्या रस्त्याने म्हणजे दौंड रेल्वे स्टेशन च्या दिशेने घरी निघाले होते, अक्षय बियरबार च्या जवळ बंगला साईड च्या बाजूने दौंडकडे येत असताना त्या रस्त्यावर दोन गतिरोधक आहेत, त्या गतिरोधक वर नानवानी यांच्या गाडीचा वेग कमी झाला त्यावेळी पाठीमागून दोन तरुण धूम स्टाईल ने जवळ आले आणि या पतीपत्नीला काही कळायच्या आत दुचाकीवरील मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यात झटक्यात हात घालून गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चैन अंदाजे किंमत 75 हजार रुपये हिसका मारून चोरून नेले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, परिसरातील सर्व cctv फुटेज पहाण्यात आले असून आरोपींचे cctv फुटेज मध्ये दोन आरोपी दुचाकी वर पळून जाताना स्पष्ट झाले असून त्यांचे फोटोही सोशल मीडियावर दौंड पोलिसांनी पाठवले आहेत हे फोटो पाहून आरोपी कोण आहेत हे ओळखण्यासाठी दौंडच्या जनतेला आवाहन केले आहे.पो हवा विठ्ठल गायकवाड, पोलीस किशोर वाघ यांनी तेथील परिसर आरोपींच्या शोधात पिंजून काढला आहे,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शरद वारे तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News