पुणे जिल्हयातील दरडप्रवण क्षेत्राचा अभ्यास करून धोकादायक गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ठोस अराखडा तयार करा.. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील


पुणे जिल्हयातील दरडप्रवण क्षेत्राचा अभ्यास करून धोकादायक गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ठोस अराखडा तयार करा.. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

विलास काळे,  घोडेगाव प्रतिनिधी 

पुणे जिल्हयातील दरडप्रवण क्षेत्राचा अभ्यास करून धोकादायक गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ठोस अराखडा तयार करा.. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या सूचना.

पुणे येथे विधानभवनात जिल्हयातील धोकादायक गावांच्या पुनर्वसन व अतिवृष्टीमूळे झालेल्या नुकसानी संदर्भात आयोजीत बैठकीत वळसे पाटील यांनी सुचना दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, आमदार सनिल शेळके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद इत्यादी उपस्थित होते.

पुणे जिल्हयातील दरडप्रवण क्षेत्र निश्चित करून यामध्ये येणारी गावे, घरे यांच्या सुरक्षेचा व पुनर्वसनाचा सविस्तर अराखडा तयार करून ठोस उपाययोजना केल्या जाव्यात. तसेच दि.२१, २२, २३ जुलै रोजी झालेल्या पावसात नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे केले जावेत.

पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनी, तुटलेले बांध, ताली यासंदर्भात पंचनामे करून जमिनी, ताली पुर्ववत करण्यासाठी पडकई व रोजगार हमी योजना यांच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात यावीत. लोकांना रोजगार देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे हाती घ्यावीत. तसेच रस्त्यांवर पडलेल्या दरडी घटविण्याचे व खराब झालेले रस्ते दुरूस्त करण्याचे काम तात्काळ हाती घ्यावे अशा सुचना याबैठकीत वळसे पाटील यांनी दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News