भिमाशंकर मंदिर परिसर कोंढवळ धबधबा डिंभे धरण आहुपे पर्यटन स्थळ आदि ठिकाणी येण्या-या पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये


भिमाशंकर मंदिर परिसर कोंढवळ धबधबा डिंभे धरण आहुपे पर्यटन स्थळ आदि ठिकाणी येण्या-या पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये

विलास काळे,घोडेगाव प्रतिनिधी

  आंबेगाव तालुक्यातील पर्यटन स्थळे, धरण परीसरात मान्सुन कालावधीत नागरिक मोठया संख्येने वर्षाविहार करण्यासाठी गर्दी करत असतात. तसेच या परिसरात पर्यटक मोठया प्रमाणात येत असल्याने कोरोना विषाणुच्या अनुषंगाने सोशल डिस्टिंग पाळले जात नसल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.


जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर मंदिर परिसर, कोंढवळ धबधबा, डिंभे धरण, आहुपे पर्यटन स्थळ आदि ठिकाणी येणा-या पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून संबंधित ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश ( १४४ कलम ) लागु करण्यात आले आहे. यामध्ये पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तिंनी एकत्र येण्यास बंदी आहे. पावसामुळे वेगाने वाहणा-या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, द-यांचे कठडे, धोकादायक वळणे आदि ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली असून  तसेच धबधब्याच्या परिसरामध्ये मदयपान करण्यास व मदयधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मदय बाळगणे, मदयवाहतूक, अनाधिकृत मदय विक्री करणे व उघडयावर मदय सेवन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे, गाडीमधील स्पिकर उफर वाजविणे तसेच धबधब्याच्या एक किलोमिटर परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडून इतर सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश बंद आहे, आदि बाबत पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु राहणार आहे. संबंधित आदेशाचे कोणतीही व्यक्ति, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम १८८ नुसार दंडनिय / कायदेशिर कारवाईस पात्र राहणार असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News