शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रंगकर्मी आंदोलन करणार मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर


शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रंगकर्मी आंदोलन करणार  मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : राज्यात कोरोना  महामारी मुळे लॉकडाऊनचे  सावट असून या महामारीचा  फटका मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली ,तर कित्येकांनी आत्महत्या केल्या.  रोजंदारीवर काम करणाऱ्या 80% रंगकर्मींनीकडे सरकारने सपशेल पाठ फिरवली. रंगकर्मींच्या या व्यथेकडे  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व रंगकर्मी आंदोलन करणार असल्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप नीचीत यांना नगरमध्ये देण्यात आले.


या निवेदनावर निर्माता-दिग्दर्शक संजय पाटील, महाराष्ट्र पोतराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे, सिने अभिनेता प्रशांत नेटके पाटील, सिनेअभिनेत्री तृप्ती घोडके आणि शहर संघटक विकास उडाणशिवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे. एक पात्री किंवा दोन-तीन कलाकारांच्या मदतीने सोसायट्यांच्या आवारात सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी,फी  न भरल्यामुळे रंगकर्मींच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले असून संबंधित संस्था चालकांशी बोलून हा प्रश्न निकाली काढावा. याव्यतिरिक्त दीड वर्षात कमाई नसल्याने घर भाडे, वीज बिल भरण्यात अडचणी येत आहेत संबंधीं आस्थापनांनी रंगकर्मींना यात सवलत द्यावी, महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी, महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा. या महाराष्ट्रातील विखुरलेल्या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी. कलाकार पेन्शन योजनेच्या लाभासाठी अटींमध्ये शिथिलता आणावी मानधनाच्या आकड्यात वाढ करावी, रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी, कलाकारांसाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी संकुलात सवलतीच्या दराने कलाकारांची सोय व्हावी, तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय विश्रामगुहांमध्ये  राहण्याची परवानगी असावी, म्हाडा व सिडकोच्या कलाकारांच्या घरांच्या संख्येत रंगकर्मींसाठी पाच टक्के कोटा वाढवून मिळावा, निराधार वयोवृद्ध कलाकारांची शासकीय आणि खाजगी वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी व त्यांची जबाबदारी शासनाने स्वीकारावी,सरकारी तसेच नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये रंगकर्मींसाठी राखीव बेड असावी आदी कलाकारांच्या  मागण्या असून हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनाकडे पोहचविण्यात आले.                    

जाहिरात
Search
विडिओ
Recent News