सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी - अँड.नितीन पोळ


सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी - अँड.नितीन पोळ

राजेंद्र तासकर कोपरगाव प्रतिनिधी 

१ ऑगस्ट रोजी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती असून सर्व समाज बांधवांनी या वेळची जयंती देखील साध्या पद्धतीने साजरी करावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे 

    आपल्या पत्रकात अॅड नितिन पोळ पुढे म्हणाले की ,संपूर्ण जग गेल्या दीड - दोन वर्षांपासून कोरोना सारख्या महामारीने हैराण झालेले आहे त्या मुळे मागील वर्षी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जयंती साधे पध्दतीने साजरी करावी लागली .गेल्या काही दिवसांपासून कोरोना साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झालेली आहे असे असले तरी अजूनही या साथीच्या आजाराचा प्रकोप कमी झालेला नाही,काही दिवसांपासून पुन्हा एकदा साथीच्या आजाराने डोके वर काढलेले असून सध्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.          १ ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती असून मानव मुक्तीचा ध्यास घेऊन अण्णा भाऊ साठे यांनी कथा कादंबऱ्या,लोक नाट्य, प्रवास वर्णन आदी साहित्यातून आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे 

आपल्या लेखणीच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांनी सर्व सामान्य शेतकरी,कामगार, कष्टकरी यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम केले असून यातून "महापुरुषांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करावी" हाच मोठा संदेश असून करोना साठीचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत सर्व समाज बांधवांनी जयंती उत्सव गर्दी न करता अत्यंत साधे पणाने साजरा करावा व आपली स्वतःची कुटुंबाची व समाजाची काळजी घ्यावी असे आवाहन या पत्रकाद्वारे केले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News