नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्या आंबेडकरी पक्ष संघटनांची केंद्र सरकारकडे मागणी


नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्या आंबेडकरी पक्ष संघटनांची केंद्र सरकारकडे मागणी

9 ऑगस्ट क्रांतीदिनाच्या नाशिक महामोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार.....राहुल डंबाळे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

पिंपरी, पुणे (दि. 30 जुलै 2021) नाशिक, ओझर येथील विमानतळास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे ही देशभरातील आंबेडकरी चळवळीतील नागरीकांची मागणी आहे. याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात पिंपरी चिंचवड पुणे शहरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहूल डंबाळे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

        या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पिंपरीत गुरुवारी (दि. 29 जुलै) पिंपरीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी कष्टकरी पंचायतीचे बाबा कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, भिमशाही संघटनेचे शिवशंकर उबाळे, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, पॅंथर सेनेचे अजय गायकवाड, महार वतन बचावाचे मिलिंद गायकवाड, नितीन कसबे, रामभाऊ ठोके, रिपाईचे अजीज शेख, रिक्षा संघटनेचे संतोष उबाळे, अश्विन दोडके, एमआयएम पक्षाच्या रुहीनाज शेख, माऊली बोराटे, रिपब्लिकन सेनेचे प्रमोद क्षीरसागर, शरद गायकवाड, दिनकर ओव्हाळ, प्रवीण जाधव, गणेश कांबळे, अमोल डंबाळे, अलेक्स कांबळे, आकाश जयस्वाल, संदीप साळवे, प्रदीप कांबळे, रुपेश ओव्हाळ, सोमनाथ मस्के, दिलीप देहाडे, बाळासाहेब जाधव, उत्तम गायकवाड, अरविंद तरकसे, मेघाताई आठवले, नवनाथ अडसूळ, सूर्यकांत जावळे, दिलीप कांबळे, अजिंक्य ठक्कर, प्रमोद शिंदे, बुद्धभूषण आहिरे, प्रसाद कांबळे, रोहन कांबळे, प्रतीक कांबळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक शिवशंकर उबाळे, बैठकीचे सूत्रसंचालन अजय लोंढे, आभार माऊली बोराटे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News