आमदार सुनिल टिंगरे यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात


आमदार सुनिल टिंगरे यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

पुणे:महापुराने संकटात सापडलेल्या कोकणवासीयासाठी आमदार सुनिल टिंगरे मित्रपरिवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वडगांवशेरी च्या वतीने ४५०० कुटूंबाना अन्नधान्य व किराणा सामानाचे किट,२००० संसारउपयोगी भांड्याचे किट  मदत कोकणात पाठवण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोन्सिल हॉल पुणे  येथे मदत सामुग्री भरलेलेल्या २० ट्रकला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून मदत मोहिमेची सुरवात केली. जुलै महिन्यात झालेल्या महापुरामुळे कोकण भागात मोठयाप्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरेदारे पाण्याखाली गेली, संसार उघड्यावर पडले,अनेक ठिकाणी जिवितहानी झाली.

महापुरामुळे संकटात सापडलेल्या कोकणवासीयांना  संकटातून सावरण्यासाठी मदत वडगावशेरी आमदार सुनिल टिंगरे यांनी  दिली आहे.आमदार सुनिलअण्णा टिंगरे मित्रपरिवार व राष्ट्रवादी काँग्रेस वडगांवशेरी यांच्या वतीने देण्यात ४५०० अन्नधान्य किराणा सामान एका किट मदत वाटण्यात आली (1 किट मध्ये तांदूळ १० किलो,गव्हाचे पीठ ५ किलो,तूरडाळ १ किलो,साखर १ किलो,अंगोळीचा साबण १,कपड्याचा साबण १,गोडेतेल १ किलो,टुथपेस्ट १,खोबरेल तेल १,कांदा मसाला १०० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, लाल मिर्ची पावडर १००ग्रॅम, चहापत्ती १०० ग्रॅम, मीठ १ किलोग्राम) तसेच २००० घरसंसार उपयोगी भांड्याच्या किट (१ किट मध्ये अल्युमिनियम पातेले २ नग,स्टेनलेस स्टील ताट २ नग,स्टील वाटी २,स्टील ग्लास २,स्टील उलथाने १,स्टील पळी १,कापडी पिशवी १) पुराने संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना वाटण्यात आले आहे. या व्यतिरिक्त ४५०० पाणी बॉटल,३०००० बिस्कीट पुडे इत्यादी सामुग्री वाटण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News