जनमोर्चाच्या बैठकीत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन


जनमोर्चाच्या बैठकीत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्यावतीने अन्नधान्य पोहचविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप,शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्ते.
अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत -) कोकण, प.महाराष्ट्रासह राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या नगर शहर व ग्रामीण जिल्हा शाखेच्यावतीने दानशुरांना आवाहन करण्यात येत आहे. पुरग्रस्त भागातील गरीब, उपेक्षित समाजापर्यंत किमान अन्नधान्य पोहचविण्याचा निर्णय शाखेच्या बैठकीत घेण्यात आला. जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली व आयोजक शाखेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी नंदनवन लॉन येथे घेण्यात आली.

     ऐनवेळी आयोजित केलेल्या या तातडीच्या बैठकीत माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, महिलाध्यक्षा सुषमा पडोळे, दत्ता जाधव, आनंद लहामगे, श्रीकांत मांढरे, डॉ.सुदर्शन गोरे,  रमेश सानप, फिरोज खान, चंद्रकांत फुलारी, संजय आव्हाड, अनिल निकम, कैलास गर्जे, बाबासाहेब सानप, दिपक खेडकर, सतीश चौधरी, आदिंनी 28 टन धान्यासह किराणा आणि 400 शाली तसेच वाहतुक व्यवस्था मदत पुरग्रस्तांसाठी बैठकीत देण्याचे जाहीर करण्यात आले. या व्यतिरिक्त मदत दोन दिवसात गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, दानशूर नागरिकांनी व जनमोर्चाच्या प्रत्येक सदस्यांनी पुरग्रस्तांसाठी मदत (रोख रक्कमेशिवाय धान्य, किराणा, खाद्या पदार्थ इ. स्वरुपात) द्यावी, असे आवाहन श्री. बाळासाहेब सानप यांनी यावेळी केले.पुरग्रस्त भागातील दयनिय स्थितीचे वर्णन करुन तेथील किमान गरीब उपेक्षितांपर्यंत आपली मदत पोहचवली गेली पाहिजे. उपेक्षित कोण आहेत ते कोणत्या जाती-धर्माचे आहेत हे न पाहता आज त्यांच्यावर वेळ आहे. ती लक्षात घेऊन आपण मदत केली पाहिजे. सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम तातडीने दोन दिवसात पुरग्रस्त ग्रामीण भागात मदत घेऊन तिचे वाटप करण्याचे नियोजन नगर शाखेने करावे, असे आवाहनही श्री. सानप यांनी यावेळी केले.

     याप्रसंगी अनिल इवळे, शामभाऊ औटी, अशोक तुपे, नईम शेख, दीपक कावळे आदिंची मदत असणार आहे, अशी माहिती समारोप करतांना श्री.भुजबळ, श्री.भिंगारे यांनी दिली. शेवटी राजेश सटाणकर यांनी आभार मानले - 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News