लोणावळा येथील 66 लाखाच्या चित्तथरारक दरोड्यातील 2 अल्पवयीन मुलांसह 5 आरोपींना अटक, LCB ची धडाकेबाज कारवाई


लोणावळा येथील 66 लाखाच्या चित्तथरारक दरोड्यातील 2 अल्पवयीन मुलांसह 5 आरोपींना अटक, LCB ची धडाकेबाज कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: लोणावळा येथील डॉ खंडेलवाल यांच्या बंगल्यात 17 जूनच्या पहाटे 1 ते 3 च्या दरम्यान खिडकीतून आत प्रवेश करून डॉ खंडेलवाल पती पत्नीला चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा 66,70,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता,दुसऱ्या दिवशी लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया,पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनीत कावीत लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,पोलीस निरीक्षक दिलीप पवार लोणावळा शहर यांच्या सूचनेनुसार आरोपींच्या शोधासाठी तपास पथके तयार करण्यात आली,समांतर तपास करीत असताना त्यांचे बंगल्यातील व आजूबाजूचे cctv फुटेज तपासून,मोबाईलच्या तांत्रिक माहिती वरून तसेच गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती घेऊन सदर गुन्ह्याचा लोणावळा, मुंबई,मालाड,अंधेरी,सांताक्रूझ,पुणे शहर,हडपसर, या ठिकाणी तपास करून 8 आरोपी ताब्यात घेतले होते, परंतू मुख्य आरोपी हा मध्यप्रदेश मध्ये फरार झाला असल्याची माहिती या आरोपिकडून मिळाली,आणि चोरीचा सर्व मुद्देमाल त्यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,पो अंमलदार सुनिल जावळे,शब्बीर पठाण,मुकुंद आयचीत,मंगेश थिगळे,बाळासाहेब खडके,मुकेश कदम,प्रकाश वाघमोडे, महेश गायकवाड,निलेश कदम,अक्षय नवले यांचे पथक मध्यप्रदेश मध्ये आरोपीला पकडण्यासाठी तीन आठवडे तळ ठोकून होते,तसेच सचिन गायकवाड आणि राजू मोमीन यांच्या तांत्रिक मदतीने जिल्हा सागर येथील गंज बसौदा,राहतगड सागर डांबरी येथे तपास करून गुन्ह्यातील 5 मुख्य आरोपीसह 2 विधिसंघरसित (अल्पवयीन)मुलांना ताब्यात घेण्यात आले,त्यांच्याकडून 30 लाख 52 हजार 200 रुपये किमतीचा माल, रोख रक्कम 6लाख 26 हजार,आणि 23 लाख 68 हजार,700 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि चोरीच्या पैशातून घेतलेले 57500 रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत,त्यांनी सदर गुन्हा इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली असून आतापर्यंत 15 आरोपी अटक करण्यात आले आहेत,यातील मुख्य आरोपी हेमंत रंगराज कुशवाह वय 24 राहणार डांबरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, घरफोडी  गोवा,महराष्ट्र,मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणी गुन्हे दाखल आहेत,या कारवाई मध्ये पो नि पद्माकर घनवट,सपोनिनेताजी गंधारे, सपोनि सचिन काळे,पो उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पो उपनिरीक्षक अमोल गोरे,सहा पो उप नि सुनिल जावळे,सहा पो उप नि शब्बीर पठाण,पो हवा सचिन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम,मुकुंद आयाचित, पो ना अजित भुजबळ,मंगेश ठिगळे,बाळासाहेब खडके,अक्षय नवले,चालक पो हवा प्रमोद नवले,मुकेश कदम,अक्षय जावळे,सहा पो उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, दत्तात्रय जगताप, पो हवा दत्तात्रय तांबे,अजय मोमीन,सुभाष राऊत,गुरुनाथ गायकवाड, जनार्धन शेळके,ज्ञानेश्वर क्षिरसागर, हनुमंत पासलकर,विक्रमसिंग तापकीर,सूर्यकांत वाणी,पो ना चंद्रकांत जाधव,अमोल शेंडगे,सहा पो उप नि काशिनाथ राजपुरे,पो कॉन्स्टेबल समाधान नाईकनवरे या सर्वांनी मिळून ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News