श्रीगोंदा तालुक्यातील तरुणाई मादक पदार्थ,गांज्याच्या धुंदीत, प्रतिष्ठेपायी पालकांची "तेरी भी चूप मेरी भी चूप" --मीरा शिंदे नियंत्रण समिती सदस्या महा शासन


श्रीगोंदा तालुक्यातील तरुणाई मादक पदार्थ,गांज्याच्या धुंदीत, प्रतिष्ठेपायी पालकांची "तेरी भी चूप मेरी भी चूप" --मीरा शिंदे नियंत्रण समिती सदस्या महा शासन

विठ्ठल होले विशेष प्रतिनीधी: श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट असून, कोविड चे  नियम सर्वसामान्य,कष्टकरी  नागरिकांसाठीच आहेत का? असा सवाल उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्या महाराष्ट्र शासन  मीरा शिंदे यांनी केला आहे, त्या पुढे म्हणाल्या असा प्रश्न पडत असेल तर नक्कीच आपण बरोबर आहात असे म्हणायला हरकत नसावी.एकीकडे भाजीपाला, कपडे,खाद्यपदार्थ, किराणा, शेती साहित्याच्या दुकाने 4 वाजता बंद होतात. तर दुसरीकडे दारू,मटका,पत्त्यांचे क्लब,गांजा यां व्यवसाय करणाऱ्याची मात्र चलती दिसते.दोन नंबर व्यवसाय बिनदिक्कत चालतात.

  अर्थात हा व्यवसाय करणारे उघड पणे नक्कीच करत नाही पण तरीही ज्यांना जे हवे ते मिळते. अश्या व्यवसाय करणारे आम्ही हप्ते देतो असे म्हणत फार मोठे पुण्य करत असल्याचे आविर्भाने सहज सांगतात.शिवाय प्रत्येक अवैध व्यवसाय करणाऱ्या च्या डोक्यावर कोणत्या ना कोणत्या पुढाऱ्याचा हाथ असतो.चुकून पकडलाच तर,साहेब आमचा माणूस आहे असा फोन केलाच म्हणून समजा.

   या सर्व परिस्थिती मुळे तालुक्यातील 17 ते 25 वयोगटातील तरूणाई मात्र धुंद होत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी मोठ्या घरातील मुले शिक्षण घेण्यासाठी पुण्यात होती.पब,बार ,सिगारेट चा कश,गांज्या ची गुडगुडी, बियरचा ग्लास,नशे ची इंजेक्शन,पार्ट्या चा झगमगाट यात काही मुले गुरफटली गेली.पण कोविड मुळे कॉलेज बंद झाले आणि पुण्याचे लोण श्रीगोंदा तालुक्यात आले.

   संध्याकाळ च्या नंतर रात्री उशिरा पर्यत शहरातील तरुण मुले आपापल्या अड्ड्यावर पोहचतात आणि संध्याकाळ च्या अंधारात शहरातील निर्जन्य ठिकाणी काजवे चमकावे तसे यांच्या गांज्या च्या आणि सिगारेटचे लाईट दिसायला लागतात.

   काही जण तर चक्क दिवसा ढवळ्या शेतात,एखाद्या रिकाम्या बंगल्यात किंवा प्लँट मध्ये नशा करतात,नशेची इंजेक्शन घेतात.

आणि मग सुरू होते गुन्हेगारी. किरकोळ वादावरून हे प्रकरण मारामाऱ्या पर्यंत पोहचते.

  विशेष म्हणजे अनेक मुलांच्या आणि व्यसन करणाऱ्या कडे तलवारी, काठ्या,कोयते असतात आणि नशेच्या धुंदीत कोणी काही बोलले की ही मंडळी तलवारी नाचवतात.आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

  अनेक पालकांना याबाबत पुसट  शीही कल्पना नसते. पण याचे प्रमाण वाढल्याने पालक वर्गात चिंता आहे पण प्रतिष्ठे पायी "तेरी भी चूप मेरी भी चूप्पी".

शहरात गांजा,नशेची इंजेक्शन कोठून येतात? मुलांना कशी मिळतात याचा तपास पोलीस प्रशासनाने करून मादक पदार्थांची विक्री करणाऱ्या व तरुणांना पुरविणाऱ्या व त्यातून बक्कळ पैसा कमविऱ्या टोळीला गजाआड करून मुलांना त्यांच्या विळख्यातून सोडवावे अशी अपेक्षा  चिंतीत पालक पोलीस प्रशासनाकडून करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News