दौंड,श्रीगोंदा, बेलवंडी येथील महिला बचत गट व फायनान्स कंपनीची 86000 हजारांची फसवणूक करणारा आरोपी अटक


दौंड,श्रीगोंदा, बेलवंडी येथील महिला बचत गट व फायनान्स कंपनीची  86000 हजारांची फसवणूक करणारा आरोपी अटक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : दौंड सरपंच वस्ती येथील फायनान्स कंपनीत रिकव्हरी एजंट कडून फसवणूक झाल्याची तक्रार दौंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती, दौंड सरपंच वस्ती येथील फायनान्स कंपनीत दौंड, श्रीगोंदा, बेलवंडी या भागातील महिला बचत गटांच्या रिकव्हरी करण्यासाठी राजीव तुकाराम सोनकांबळे वय 26 सध्या राहणार गोपाळवाडी रोड सरपंच वस्ती मूळ राहणार रुई, तालुका कंधार जिल्हा नांदेड याची नियुक्ती करण्यात आली होती,तो महिला बचत गटांच्या रिकव्हरी करण्याचे काम करीत होता,त्यामध्ये रोख कॅश,फोन पे,गुगल पे अशा प्रकारे रक्कम जमा करीत होता,परंतू एरिया मॅनेजर तेजस डहाके यांना महिन्याची टॅली करताना राजीव याने 86157 रुपये रक्कम वसूल केली आहे परंतू कंपनीच्या अकाऊंट मध्ये जमा झालेली दिसली नाही,डहाके यांनी दौंड पोलीस ठाण्यात राजीव सोनकांबळे याच्याविरुद्ध फसवणूक केल्याबाबत तक्रार दाखल केली,33 गोरगरीब महिलांची फसवणूक झाल्यामुळे  पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेतली,आणि पो हवा श्रावण गुपचे,पो ना किरण पांढरे यांना आरोपीच्या गावी रुई येथे रवाना केले,आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त 48 तासाच्या आत दौंड पोलीस स्टेशन येथे आणून मा कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा श्रावण गुपचे पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News