सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांचा अ.भा. छावा संघटनेत प्रवेश


सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांचा अ.भा. छावा संघटनेत प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- अखिल भारतीय छावा संघटनेत सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांनी प्रवेश केला. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला. यावेळी विजय धाडगे, भीमभाऊ मराठे, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हा अध्यक्ष नितिन पठारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा सांगळे, अनिता काळे आदी उपस्थित होते.

छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांचे कार्य सुरु होते. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची धूरा सांभाळून वंचित घटक, कामगार वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेत प्रवेश केला असून, संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नानासाहेब जावळे यांनी काळे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन वंचितांना न्याय देण्यासाठी कटिब्ध्द राहण्याचे सांगितले.  

अखिल भारतीय छावा संघटनेत सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांनी प्रवेश केला असता, त्यांचे स्वागत करताना केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे समवेत विजय धाडगे, भीमभाऊ मराठे, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हा अध्यक्ष नितिन पठारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा सांगळे, अनिता काळे आदी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News