लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी पुरस्कार बाबू पोचीराम कांबळे यांना जाहीर


लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी पुरस्कार बाबू पोचीराम कांबळे यांना जाहीर

पुणे दिनांक --- लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी  वर्षानिमित्त दिला जाणारा पुरस्कार ,मराठवाडा नामांतर लढ्यातील शहीद पोचिराम कांबळे यांचे चिरंजीव बाबू पोचिराम कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.अशी घोषणा रिपबलिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी चे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी केली आहे.

               लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जयंती निम्मित हा पुरस्कार दिला जात आहे .या जयंतीचे निम्मित साधत हा पुरस्कार पोचीराम कांबळे यांचा मुलाला देऊन त्यांचा उचित सन्मान करण्याचा मानस असल्याचे या वेळी वाडेकर यांनी सांगितले .या पुरस्काराचे वितरण पुण्यात 2 ऑगस्ट रोजी  उपमहापौर सूनिताताई वाडेकर यांच्या हस्ते होणार आहे.

        यावर्षी लोकशाहीर  आण्णा भाऊ साठे जयंती निम्मित विविध कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले आहे .1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध गायक राहुल शिंदे यांचा लोकगीतांच्या कार्यक्रम आयोजित केला आहे .2 ला बाबू पोचीराम कांबळे पुरस्कार ,3 ला कोरोना योद्ध्याचा पुरस्कार समारंभ तर 4 ला पोलीस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News