चिंचवड देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी अशोक गायकवाड यांच्या कुटुंबियांना ट्रस्टकडून आर्थिक मदत


चिंचवड देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी अशोक गायकवाड यांच्या कुटुंबियांना ट्रस्टकडून आर्थिक मदत

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)    अष्टविनायक प्रथम तिर्थक्षेत्र मोरगांव (ता.बारामती) येथील चिंचवड देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी अशोक नाना गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे देवस्थान मार्फत त्यांच्या पत्नीस पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत आज देण्यात आली. 

  चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली अष्टविनायकापैकी मोरगाव हे तीर्थक्षेत्र आहे. येथे प्रसाद विक्री विभागात मोरगाव येथील अशोक नाना गायकवाड काम करीत होते. त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामध्ये गायकवाड यांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी मांडला होता. यानुसार विश्वस्त मंडळाच्या झालेल्या मासिक सभेमध्ये मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप यांनी त्यास संमती दर्शविली होती.

   यानुसार आज मोरगाव येथे गायकवाड यांच्या पत्नी प्रभावती अशोक गायकवाड यांना आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयांचा धनादेश स्थानिक विश्वस्त विनोद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News