चंद्रकांत पाटील यांना कोणत्याही ऑडिओ क्लिप्स पाठवण्यात आल्या नाही -राज ठाकरे


चंद्रकांत पाटील यांना कोणत्याही ऑडिओ क्लिप्स पाठवण्यात आल्या नाही -राज ठाकरे

पुणे : मनसे आणि भाजपच्या युतीबाबत राजकीय वर्तृळात जोरदार वारे वाहू लागले. मात्र, सध्या तरी मनसेसोबत युती करण्याचा विचार नसल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. ही बाब ताजी असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर भारतींच्याबद्दल काय विचार आहेत त्याच्या ऑडिओ क्लिप्स भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होते. तशी बातमी समोर आली होती. यावर आता स्वत: राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज ठाकरे सध्या आगामी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर दौऱ्यावर आहेत. सध्या ३ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असताना   त्यांनी त्या ऑडिओ क्लिप्स बाबत खुलासा केला आहे. राज ठाकरे असं म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना कोणत्याही ऑडिओ क्लिप्स पाठवण्यात आल्या नाही. राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांवर केलेल्या केलेल्या भाषणाची क्लिप पाठवली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे असं म्हणाले की, क्लिप्सवरुन भाजप-मनसे युतीचं सुत जूळवू नका. माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. कोणत्याही क्लिप्स चंद्रकांत पाटलांकडे गेल्या नाहीत, असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. त्यामुळे आता भाजप-मनसेच्या युतीवर राज ठाकरे यांनीच खुलासा केल्याने युतीच्या चर्चेला पुर्णविराम लागला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News