दौंड तालुक्यात ग्रामसेवक लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात,कामाचे बिल काढण्यासाठी मागीतली लाच


दौंड तालुक्यात ग्रामसेवक लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात,कामाचे बिल काढण्यासाठी मागीतली लाच

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
- दौंड तालुक्यातील गार ग्रामपंचायत येथे असलेल्या ग्रामसेवकास आणि त्याची आणि फिर्यादीची मध्यस्थी करणारा अशा दोघांना लाच स्विकारताना अटक करण्यात आल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पो हवा गावडे यांनी दिली आहे, फिर्यादी सोमनाथ अरुण कांबळे वय 36 व्यवसाय काँट्रॅकटर राहणार नवीन गार तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी 26/7/21 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती, त्यानुसार 27/7/21 रोजी पंचायत समिती गेस्ट हाऊस वडार गल्ली रोड दौंड पुणे येथे घेण्याचे ठरवले होते, म्हणून त्याठिकाणी सापळा लावण्यात आला होता, फिर्यादी सोमनाथ कांबळे यांनी गार ग्रामपंचायत हद्दीतील आंबेडकर नगर मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीत बंद गटाराचे कामे केली होती त्याचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक नवनाथ किसन चव्हाण यांचेकडे मागितले असता त्यांनी मध्यस्थी करवी कांबळे याना 30 हजार रुपये मागितले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे, त्यासाठी सचिन लहानू वायसे वय 33 राहणार बेटवाडी गार पो गिरीम याने मध्यस्थीचे काम केले फिर्यादी कांबळे यांना सदर कामाचे बिल पाहिजे असेल तर 30 हजार रुपये द्यावे लागतील,त्यामुळे कांबळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे सदर घटनेची तक्रार दिली, त्यानुसार दौंड येथे सापळा रचून गार ग्रामपंचायत चे  ग्रामसेवक नवनाथ चव्हाण वय 35 राहणार ए 9 गजानन सोसायटी दौंड आणि मध्यस्थी सचिन वायसे या दोघांना 30 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर भाग 6 गुन्हा रजिस्टर नंबर 417/21 भ्रष्टाचार प्रतिबंधक आधीनियम 1988 चे कलम 7,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती अलका सरग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News