माळेगाव येथे पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेची बैठक संपन्न, तालुका कार्यकारणी जाहीर


माळेगाव येथे पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेची बैठक संपन्न, तालुका कार्यकारणी जाहीर

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

माळेगाव बु. (ता.बारामती) येथील जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था, भारत यांच्यावतीने बारामती तालुक्यातील  पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. 
   या कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सचिव दिपक काळेसाहेब उपस्थित होते. यावेळी पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबेसर ही उपस्थित होते.
   संस्थेच्या माध्यमातून संस्थेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या विस्तारनुसार महाराष्ट्र राज्य, इतर १६ राज्ये आणि ११ देश यातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील तालुक्यात भविष्यात जगात ऑक्सिजन वाचून कोणत्याही सजीवांचा मृत्यू होऊ नये यासाठी प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर "महावृक्षारोपन ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारणी मोहीम" हाती घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तांबे यांनी दिली.
      यावेळी पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेच्या बारामती तालुका मार्गदर्शकपदी मोहन जगताप, सल्लागारपदी काशिनाथ पिंगळे, बारामती तालुका अध्यक्षपदी मंगेश खताळ, उपाध्यक्ष- संतोष गोलांडे, सचिव- हनुमंत मोरे, निरीक्षक- सचिन गारडे, समन्वयक- मधुकर वायकर, संघटक- दीपक बोबडे, प्रसिद्धीप्रमुख- राजेश मोरे, बारामती तालुका युवा संघटक सर्पमित्र शुभम लोणकर यांच्या निवडी करण्यात आल्या. याठिकाणी सोनचाफा वृक्षाच्या रोपांचे रोपण करण्यात आले.
         या उपस्थित पदाधिकाऱ्यांना संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे, सचिव दीपक काळे व मंगेश खताळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी लकडे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना व संस्थेच्या कामाला शुभेच्छा दिल्या. मोहन जगताप, राजेश मोरे, निलेश पवार, काशिनाथ पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News