माजी सरपंच संभाजी खडके यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते कोरोना काळात कोरोना योद्धांना कोविड योद्धा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित


माजी सरपंच संभाजी खडके यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते कोरोना काळात कोरोना योद्धांना कोविड योद्धा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

कुरकुंभ:प्रतिनिधी

पाटस (ता. दौंड ) गावातील मोटेवाडा वस्तीमध्ये  दि. २८.०७.२०२१ रोजी १:३० वा. माजी सरपंच संभाजी खडके यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त मंदिरातील हॉलमध्ये आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते सत्कार व कोरोना योद्धांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. आमदार कुल यांनी वाढदिवसानिमित्त खडके यांना फेटा बांधून शुभेच्छा दिल्या.आणि कोरोना काळात सामाजिक काम खडके यांनी केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले.

माजी सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राहुल कुल यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान पाटस यांच्या नावाने कोरोना योद्धांना  कोविड योद्धा ट्रॉफी व सन्मानपत्र देण्यात आले होते. तसेच सरपंच खडके यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी ब्लड बँक दौंड तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.नेत्रतपासनी ,मोफत शस्त्रक्रिया शिबीर,अल्पदरात चष्मे वाटप,रक्तदाब, शुगर,हिमोग्लोबिन  तपासणी शिबीर, कोरोना योद्धांना कोविड योद्धा पुरस्कार वितरण,मोटेवाडा येथे माळराणामध्ये ,डोंगर, टेकड्यांवर,जंगली रोपट्यांचे वाटत करण्यात आले. यावेळी उपस्थित खडके यांच्या मातोश्री व जवळीक नातेवाईक आणि मित्रपरिवार व ग्रामस्थ, दौंड तालुक्यातील पत्रकार बांधव,वरिष्ठ पत्रकार अहिल्या टाईम्स साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक राजेंद्र सोनवलकर, दौंड महान्यूज चे प्रतिनिधी राजेंद्र झेंडे, जनप्रवास दै.कुरकुंभ जनप्रवास प्रतिनिधी सुरेश बागल, डॉ. बडे सर, अंकिता परदेशी, पत्रकार सचिन आव्हाड, पत्रकार रुपणवर, आबासाहेब चोरमले, प्रशांतजी शेंडगे, श्रीकांत हंडाळ साहेब,आरोग्य सेविका, रुपाली चितारे, जागृती काकडे आणि अन्य कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपलेली आहे अशा सर्व पत्रकार आणि नागरिक यांना कोरोना योद्धा ट्रॉफी देऊन सन्मानपत्र देऊन आमदार कुल यांनी सन्मानित केले. ज्या लोकांनी रक्तदान केले त्यांना ब्लड बँकेतर्फे सर्टिफिकेट देण्यात आले आणि माजी सरपंच संभाजी खडके यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचा मोकळा जी आर भेट देण्यात आला .कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या पत्रकारांनी आणि नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपलेली अशा सर्व जणांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News