उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांचा सत्कार


उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांचा सत्कार

सानप यांनी उत्तमपणे कार्य करुन नगर तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावला -विजय भालसिंग 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला असून, त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचा सत्कार केला. 

विजय भालसिंग म्हणाले की, नगर तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले होते. सहा. पो.नि. सानप यांनी उत्तमपणे कार्य करुन नगर तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावला आहे. नगर तालुक्यातील अनेक अवैध धंदे बंद झाले असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नगर तालुक्यातील महामार्गावर होणारी लूट व चोर्‍याच्या घटना थांबविण्यासाठी त्यांचे उत्तमपणे नियोजन सुरु असून, या कार्यात देखील सहकार्य करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून झालेला सत्कार ही कामाची खरी पावती आहे. नगर तालुक्यातील महामार्गावरील लुटमार थांबविण्यासाठी गावागावात ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून युवकांना सज्ज केले जात आहे. वाळकी येथे देखील युवकांची टिम तयार करुन सदर युवक पोलीसांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News