सरदवाडी येथील एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस अखेर ३ आरोपींकडून ४ चोरीच्या मोटरसायकली जप्त तर एकूण ५ चोरीचे गुन्हे उघडकीस पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी एकच नंबर...!


सरदवाडी येथील एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस अखेर ३ आरोपींकडून ४ चोरीच्या मोटरसायकली जप्त तर एकूण ५ चोरीचे गुन्हे उघडकीस पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी एकच नंबर...!

शिरूर |प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

          शिरूर शहराताच नव्हे तर तालुक्यातील सर्वच ठिकाणी कळत नकळत वाढती गुन्हेगारी ही गुन्हेगारी का ? वाढते यामागे पोलिसांनी कितीही करडी नजर ठेवली तरी ही गुन्हे घडतात. सरदवाडी येथील ॲक्सिस बँकचे एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न एटीएम चोरीचा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुढील तपास शिरूर पोलीस करत आहे.

           पोलीस सूत्राकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार दि.२०/०७/२०२१ रोजी रात्री १२:३० वा.चे सुमारास पुणे नगर रोड, सरदवाडी ता.शिरूर जि.पुणे येथे असलेले ॲक्सिस बँकचे एटीएम कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गॅस कटरचे सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला व एटीएमच्या रूममध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तसेच एटीएमच्या मशीनचे नुकसान केलेबाबत धनंजय दशरथ गायकवाड वय २८ वर्ष रा.कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पो.स्टे. गु.र.नं. ५४०/२०२१ भादंवि क. ३८०, ५११, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

     सदर घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा.पोलीस अधीक्षक सो. यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासणी करून आरोपींची माहिती काढली असता ते नेवासा फाटा या भागातील असल्याची माहिती समजलेने अहमदनगर जिल्हयात जाऊन त्यांच्यावर पाळत ठेवून आरोपी नामे - १.आकाश उर्फ निलेश अनिल गायकवाड वय २७ वर्षे रा.नेवासा, ज्ञानेश्वर मंदिर रोड, ता.नेवासा जि.अहमदनगर.२.तन्मय उर्फ सोनल संदिप साळवे वय २१ वर्षे रा.नेवासाफाटा, मुकींदपूर ता.नेवासा जि.अहमदनगर:३.अशिष माणिक डुकरे वय २१ वर्षे रा.नेवासाफाटा, मुकींदपूर ता.नेवासा जि.अहमदनगर यांनी वाळूंज एमायडीसी येथून पहाटेच्या सुमारास चोरलेल्या दोन मोटरसायकली बेलापूर ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर येथे विक्री करणेसाठी आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेकडे अधिक विचारपूस करता त्यांनी ७ दिवसापूर्वी शिरूर, सरदवाडी येथील एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी औरंगाबाद वाळूंज एमआयडीसी येथून १ बजाज पल्सर, १ होंडा शाइन व अहमदनगर एमआयडीसी येथून १ होंडा शाइन व तोफखाना येथून १ होंडा पॅशन प्रो अशा एकूण ४ मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले आहे. त्याबाबत खालील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

१) वाळूंज एमआयडीसी पो.स्टे. (औरंगाबाद) गु.र.नं.७८३/२०२१भादंवि क.३७९,२) वाळूंज एमआयडीसी पो.स्टे. (औरंगाबाद) गु.र.नं.७८४/२०२१ भादंवि क.३७९,३) अहमदनगर एमआयडीसी पो.स्टे. (अहमदनगर) गु.र.नं. ४३७/२०२१ भादंवि क.३७९,४) तोफखाना पो.स्टे. (अहमदनगर) गु.र.नं. /२०२१ भादंवि क.३७९ कलम सदर चोरीच्या ४ मोटरसायकली किं.रू.२, ५५,०००/- (दोन लाख पंचावन्न हजार) च्या तिघे आरोपींकडून जप्त* करून  मोटरसायकल चोरीचे ४ व एटीएम चोरीचा १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. 

     सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना शिरूर पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

                 सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते.दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सपोनि.सचिन काळे,पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पो.हवा,जनार्दन शेळके,पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. राजू मोमीन,पोहवा. सुभाष राऊत,पोहवा. गुरु गायकवाड,पोना. अजित भुजबळ,पो.ना. अभिजित एकाशिंगे,पोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News