गुंड गण्या रासकर खून प्रकरणातील आणखी एक आरोपी अटक,पो.नि. सुनिल महाडिक आणि टीमची दबंग कारवाई


गुंड गण्या रासकर खून प्रकरणातील आणखी एक आरोपी अटक,पो.नि. सुनिल महाडिक आणि टीमची दबंग कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

निरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याच्या खून प्रकरणी त्याचा साथीदार असलेल्या व गण्याचा खुनाचा मुख्य सूत्रधार गौरव लकडे याला अटक करण्यात जेजुरी पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात यश आले आहे,जेजुरी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक 16.7 21 रोजी रोजी सायंकाळी  निरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा खून एकेकाळी त्याचाच साथीदार असणारा गौरव लकडे याने त्याचा साथीदार निखिल डावरे सोबत गणेश रासकर यांच्या डोक्यात व जबड्यावर अत्यंत जवळून गोळीबार करून केलेला आहे,सदर गुन्हा घडल्यानंतर छत्तीस तासाच्या आतच निखिल डावरे तसेच कटामध्ये सामील असणारा गणेश जाधव व आरोपीला अग्निशस्त्र व काडतूस विकणारा कदम यांना पोलिसांनी अटक केली होती 

परंतु पोलिसांना गुंगारा देत यातील मुख्य आरोपी गौरव लकडे अद्याप पर्यंत पोलिसांना मिळाला नव्हता सदर आरोपी साठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती परंतु तो पोलिसांना मिळत नव्हता सदर आरोपी साठी पोलिसांनी सातारा सांगली पंढरपूर या ठिकाणी शोध घेतला होता परंतु सदर चा आरोपी हा गुन्हा केल्यापासून लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील त्याच्या मिरेवाडी गावातील शिवारात उसामध्ये लपून बसला होता जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक खांडे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर आरोपी उसाच्या शेतामध्ये आहे त्यावेळेस रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कुतवळ पोलीस हवालदार विठ्ठल कदम पोलीस नाईक धर्मवीर खांडे पोलीस हवालदार संदीप कारंडे संदीप मोकाशी तसेच नीरा पोलीस चौकी याठिकाणी असणारे पोलीस उपनिरीक्षक गोत पगार सोनवलकर सुरेश भापकर सुदर्शन होळकर निलेश जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड पोलीस शिपाई प्रवीण शेंडे चालक पोलीस शिपाई भानुदास सरक संजय धामाल यांनी त्या ठिकाणी उसात चोहो बाजूने घेराव करून  सदर मुख्य आरोपी गौरव जगन्नाथ लकडे वय 24 वर्षे राहणार मेरे वाडी तालुका फलटण याला ताब्यात घेतले सदर आरोपीला अटक करून माननीय न्यायाधीश पाटील मॅडम यांच्यासमोर हजर केले असता सदर आरोपी ला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे सदर आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल व मॅक्झिन त्याच्या शेतातील जुन्या घरात लपवून ठेवले होते ते पोलिसांना काढून दिले आहेत सदरचे हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे सदर आरोपी कडे पोलीस कसून चौकशी करत आहेत यामध्ये आणखी कुणाची यामध्ये सहभाग आहे का याची चाचपणी करत आहेत सदर आरोपी च्या मदतीने अग्निशस्त्र सप्लाय करणारे मुख्य आरोपी पर्यंत पोलिस पोहोचणार आहेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण अधीक्षक माननीय डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News