अष्टविनायक मार्ग पूर्ण होण्याआधीच ठिकठिकाणी खड्डे पडण्यास सुरवात,निकृष्ट दर्जा पॅच मारून झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न


अष्टविनायक मार्ग पूर्ण होण्याआधीच ठिकठिकाणी खड्डे पडण्यास सुरवात,निकृष्ट दर्जा पॅच मारून झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी 

दौंड तालुक्यातुन सिद्धटेक कडे पाटस ते दौंड मार्गे अष्टविनायक मार्ग जात आहे, या रस्त्याचे काम अजून पूर्णत्वास गेले नाही तोपर्यंतच पाठीमागे खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे, आणि खड्डे उकरून पुन्हा पॅच मारून चुकीच्या पद्धतीने बुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे,दौंड तालुक्यातील मनमाड बेळगाव रस्त्याची जी अवस्था झाली आहे तीच अवस्था अष्टविनायक मार्गाची होताना दिसत आहे,दोन्ही रस्त्यासाठी दौंड कराना संघर्षच करावा लागला आहे, हे दौंडकरांचे मोठे दुर्दैव आहे, पाटस ते दौंड रस्त्यावर ओढे,नाले,पाटबंधारे विभागाचे कॅनल या


प्रत्येक ठिकाणी पुलावर रस्ता खचला असून त्यावर पुन्हा पॅच मारले जात आहेत, बेटवडी गावाच्या रस्त्याच्या समोर खचलेल्या ठिकाणी अगोदरच्या रस्त्या पेक्षा उंच पॅच मारण्यात आल्यामुळे त्याठिकाणी वाहने आदळत आहेत,दुचाकी आणि चारचाकी वाहनांना झटका बसत आहे,बेटवाडी येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की ट्रक, टेम्पो सारखी मोठी वाहने रिकामी जात असताना अपघात झाल्यासारखा मोठा आवाज होतो आणि तो आवाज रात्रीच्या वेळी आमच्या बेटवाडी गावापर्यंत ऐकू येतो, तेथे दुचाकीवरील महिलांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे, विजय ढाब्याशेजारी छोट्या कॅनॉल वरचा रस्ता खचण्यास सुरवात झाली आहे, महिन्याभरातच तेथे पॅच मारण्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,कितीतरी वर्षातून होणाऱ्या रस्त्याची एक वर्षाच्या आतच ही परिस्थिती होत आहे, आणि रस्ता चांगला व्हावा,ठरला आहे तेवढाच रस्ता होण्यासाठी जर दौंडकरांना जनआंदोलन, उपोषण करावे लागत असेल हे दौंडकरांचे मोठे दुर्दैव आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News