उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वंजारवाडी येथे कोविड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न !


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वंजारवाडी येथे कोविड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न !

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : बारामती -  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या ६२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत वंजारवाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती आयोजित कोविड योद्धा पुरस्कार वितरण सभारंभ सोहळा सोमवारी (ता. २६) ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.


      यावेळी संभाजीनाना होळकर (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती), श्री राहुल काळभोर साहेब (गटविकास अधिकारी, पं. स. बारामती), श्री विनोद दासा चौधर (विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत वंजारवाडी), श्री मोहन चौधर व श्री बबन सावंत (सदस्य, ग्रामपंचायत वंजारवाडी), ग्रामस्थ श्री रणजित जगताप श्री अजित चौधर, श्री यशवंत चौधर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

      यामध्ये डॉक्टर, आशा सेविका,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, प्राथमिक शिक्षक - शिक्षिका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी,  वाहनचालक, अशा २३ कोरोना योद्धा चा सत्कार सन्मानपत्र, शाल व श्रीफळ , गुलाबपुष्प, तसेच ट्रॉफी देऊन  गौरवण्यात आले.

    या कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच श्री विनोद चौधर, सदस्य श्री मोहन चौधर, श्री बबन सावंत, ग्रामसेवक श्री निलेश लव्हटे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अत्यंत नियोजनबद्दपणे केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News